Rahuri : महिला पोलिसाचा विनयभंग करुन गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासली

आरोपी देवळाली प्रवरातील माजी सैनिक

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री  

देवळाली प्रवरा येथील एका पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेऊन पोलिस भरती झालेल्या महिला पोलिसाची प्रशिक्षण संस्थेच्या संचालकाने नाशिक येथे घरी जावून विनयभंग केला असून नाशिक उपनगर पोलिस ठाण्यात प्रशिक्षण संस्थेचा संचालक राजेंद्र भाऊसाहेब कडू (वय 56) याच्या विरोधात महिला पोलिसाच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रशिक्षण संस्थेच्या संचालकाने गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासली आहे.

याबाबत नाशिक उपनगर पोलिस ठाणे अंमलदार व तपासी अंमलदार साहय्यक पोलिस उप निरीक्षक बाळासाहेब सोनवणे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार देवळाली प्रवरा येथील नगर मनमाड लगत असलेल्या पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण संस्थेचा संचालक राजेंद्र भाऊसाहेब कडू याने आपल्या प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेऊन भरती झालेल्या महिला पोलिसाचे घर पाहण्याच्या बहाण्याने जाऊन चहा करण्यासाठी स्वयंपाक घरात गेलेल्या महिलेच्या पाठीमागून जाऊन मिठी मारुन अंगलट करुन लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. यावेळी त्या महिला पोलिसाने मोठ्याने आरडाओरड केली. त्याचवेळी राजेंद्र कडू यांनी धूम ठोकली.

महिला पोलिसाच्या फिर्यादीत, असे नमुद करण्यात करण्यात आले आहे की, भरती पूर्व प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण कालावधीतही या संचालकाने अंगलट करण्याचा प्रयत्न केला होता. दि.14 जुलै रोजी दुपारी 3;30 वाजता प्रशिक्षण संस्थेचा संचालक राजेंद्र भाऊसाहेब कडू हा घरी येण्यापूर्वी महिला पोलिसाच्या पतीला भ्रमणभाषवर संपर्क साधून विद्यार्थीनीचे घर पाहण्यासाठी आलो आहे. त्या महिला पोलिसाच्या पतीने मी घरी नाही सैन्यदलात आहे. परंतू मी तीला भ्रमणभाषकरुन सांगतो तुझे गुरु आले आहेत. त्यांना घरी घेऊन जावून चहा पाणी कर असा पतीचा निरोप मिळाल्याने गुरुच्या नात्याने महिला पोलिसाने राजेंद्र कडू याला घरी नेले. चहा करण्यासाठी स्वयंपाक घरात गेली असता पाठीमागून जाऊन मिठी  मारुन अंगलट करण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिला पोलिस मोठमोठ्याने आरडाओरड केली असता त्याने घाबरुन जाऊन तो पळून गेला.

महिला पोलिसाने उपनगर पोलीस ठाण्यात विनयभंगाची फिर्याद दाखल केली आहे. उपनगर पोलीस ठाण्यात गु.रं. नं. 366/2020  नुसार 354 ,323 कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पुढील तपास साहय्यक पोलिस उप निरीक्षक  बाळासाहेब  सोनवणे हे करीत आहेत.

सोशल मीडियावर देवळालीच्या असाराम बापूची चर्चा 

देवळाली प्रवरात शनिवारी सकाळी सोशल मीडियावर त्या भरती पूर्व प्रशिक्षण संस्थेच्या संचालकाचा फोटो व त्या खाली देवळालीचा असाराम बापू पकडला, असे व्हायरल करण्यात आला होता. या असाराम बापूला जनतेने धडा शिकविला पाहिजे. यापूर्वी या संचालकाने आपल्या भगिनीशी अंगलट केली, असेल तर फिर्याद दाखल करा. त्या विद्यार्थीनीला पूर्ण संरक्षण देण्यात येईल. म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोखू देऊ नका, असे आवाहन सोशल मीडियावरुन करण्यात येत होते.

यापूर्वीचे प्रकरण पैसा आणि दडपशाहीने मिटविले 

यापूर्वी पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण संस्थेच्या संचालकाने प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींशी अंगलट केली असल्याची चर्चा पुढे येत आहे. परंतू पैशाच्या जोरावर व दडपशाहीने व विद्यार्थींनीच्या मूळ गुणपञिका व कागदपञे ताब्यात ठेवल्याने  विद्यार्थींनीनी कुठेही तक्रार केली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here