Ahmednagar : जिल्ह्यात आज तब्बल १२६ रुग्णांची कोरोनावर मात 

नवे ५४ रुग्ण बाधित आढळले; १३२ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह
अहमदनगर: जिल्ह्यात आज तब्बल १२६ रुग्ण कोरोनातून बरे झाले. यामध्ये जामखेड ०२,नगर ग्रामीण ३,नगर शहर ७९, नेवासा २,पारनेर ०३,राहाता ७, संगमनेर १७,शेवगाव १,श्रीगोंदा १०, श्रीरामपूर येथील ०२ रुग्णांचा समावेश आहे. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज सकाळी ५४ रुग्णांचे अहवाल बाधित आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ५३८ इतकी झाली आहे तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९२० इतकी झाली आहे.
आज बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये  नगर शहर १० (मार्केट यार्ड ०३, नालेगाव ०१, केडगाव ०१, भिस्तबाग चौक ०१, सूडके मळा ०१, रेल्वे स्टेशन ०१, रंगार गल्ली ०१, बागड पट्टी ०१).
श्रीरामपूर ०४ (शहर ०२, बेलापूर ०१, शिरसगाव ०१,).
कर्जत ०२ (शहर ०१, माही जळगाव ०१). अकोले ०४ (शहर ०३, लहीत ०१)
जामखेड ०२ (सोनेगाव ०१, साकत०१).
नगर ग्रामीण ०३ (निंबलक ०१, घोस्पुरी ०१, निमगाव घाना ०१).
पाथर्डी ०१, शेवगाव १० (शहर ०५, मुंगी ०५).
नेवासा ०३ (सोनई).
पारनेर ०९ (लोणी मावळा ०३, पिंपळगाव रोठा ०२, कर्जुले हर्या ०१, कुंभार वाडी ०१, वडनेर बुद्रुक ०१, खडक वाडी ०१)
संगमनेर ०६ (गुंजाळ वाडी ०३, कुरण ०३) अशा रुग्णाचा समावेश आहे.
*उपचार सुरू असलेले रुग्ण:५४०*
*बरे झालेले रुग्ण: ९२०*
*मृत्यू: ३५*
*एकूण रुग्ण संख्या:१४९३*
*(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here