Shrirampur : जिल्हा कृषी अधिकार्‍यांच्या आशीर्वादाने विक्रेते करतात खतांची लिंकींग

0

छावाचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांचा आरोप; आंदोलनाचा इशारा

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

जिल्ह्यातील खत विक्रेते युरिया खतांसोबत इतर खते घेण्याची सक्ती करत असून शेतकर्‍यांवर होणारा अन्याय हा जिल्हा कृषीअधिकार्‍यांच्या आशीर्वादानेच सुरू असल्याचा घनाघाती आरोप अखिल भारतीय छावा मराठा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांनी केला आहे. त्यांनी संघटनेच्या पदाधिकार्‍यांसह जिल्हाधिकारी शिवाजी जगताप यांची भेट घेऊन यासंबंधी निवेदन दिले. विक्रेत्यांकडून शेतकर्‍यांवर होणारा हा अन्याय न थांबल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन जिल्हाभर छेडण्याचा इशारा पटारे यांनी दिला आहे.

पटारे यांनी निलेश बनकर, अमोल वाळूंज, नितीन कल्हापूरे, किशोर शिकारे या पदाधिकार्‍यांसमवेत जिल्हाकृषी अधिकारी जगताप यांची भेट घेतली. तासभर त्यांच्याशी शेतकर्‍यांची होत असलेली लूट कशा प्रकारे सुरू आहे, याची माहिती दिली.

यावेळी त्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, युरिया खत शेतकर्‍यांना विक्री करतांना सोबत इतर खत घ्यावे, असा आग्रह होत असल्याचा आरोप शेतकरी वर्ग करत असतो त्याचे मूळ खत उत्पादक कंपनी आहे. ही कंपनी विक्रेत्यांना इतर खते घेतली तरच युरिया पाठवतात आणि जर कोणी विक्रेत्यांनी विरोध केला तर त्याला कोणीही युरिया देत नाही.

कृषी अधिकारी स्वतः युरिया रेख वाटप करतात असे डीलर सांगतायेत नक्की युरिया कोण पळवतो कंपनीकडून इतर खताची सक्ती का केली जाते. याची चौकशी करून संबंधित युरिया उत्पादक कंपन्यांनवर कायदेशीर कारवाई, करावी आणि शेतकर्‍यांना युरिया उपलब्ध करून देताना इतर खताची सक्ती होणार नाही याची दखल घ्यावी. लवकरात लवकर दोषी खत विक्रेत्यांवर कारवाई करून ही लिंकींग थांबवावी अन्यथा छावाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here