Agriculture : Sangamner : बाजार समितीमध्ये डाळींबास उच्चांकी बाजारभाव

2

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

संगमनेर कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळींबाच्या बाजारभावामध्ये चढउतार जरी होत असला तरी देखील आज बाजार समितीत डाळींबास उच्चांकी बाजारभाव मिळाला आहे एक नंबर डाळींबाला दोन हजार एकशे 21 रूपयांपर्यंत बाजारभाव निघाले आहेत. त्यामुळे डाळींब उत्पादन शेतकऱ्या मध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

कोरोना विषाणु प्रादुर्भावा सुरु असल्यामुळे सध्या शेतीमाल तसेच डाळींब मालाला बाहेरच्या मार्केट मध्ये विक्री करण्यास अनंत अडचणी येत असताना सुध्दा संगमनेर बाजार समितीमधील सर्व डाळींब व्यापारी व आडते शेतकऱ्याच्या मालाला चांगले भाव मिळवुन देत आहेत.

पावसामुळे डाळींब या पिकाची खूप मोठी हानी झालेली दिसुन येत आहे. सततच्या पावसामुळे डाळींब या फळावर मोठेमोठे ठिपके पडुन फळ खराब होत आहे त्यामुळे शेतकरी आपले डाळींब व इतर शेतमाल पावसामुळे खराब होण्यापेक्षा जसा पिकेल तसा बाजार भावाची चिंता न करता बाजारात विक्री साठी आणत आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या डाळींब या शेतमालाला चांगला भाव मिळत नाही परतुं संगमनेर बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या कांदा, डाळींब, टोमँटो या शेतमालाला चांगला भाव मिळताना दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतमाल संगमनेर कृषि उत्पन्न बाजार समिती येथे विक्रीसाठी तसेच चांगलाबाजारभाव मिळण्यासाठी योग्य पध्दतीने ग्रेडींग करुनच आणावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर,सचिव सतिषराव गुंजाळ तसेच सर्व संचालक मंडळ यांनी केले आहे.

आज संगमनेर कृषि उत्पन्न  बाजार समिती मध्ये विशाल पवार या शेतकऱ्याच्या डाळींबास प्रति क्रेट दोन हजार एकशे 21 असा विक्रमी बाजार भाव  मिळाला आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here