Shrirampur : विनाकारण फिरणा-या दोघांवर बेलापूर पोलिसांकडून कारवाई 

नियम न पाळणा-यांनो सावधान

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
 

बेलापूर पोलिसांनी विना मास्क फिरणारे तसेच विनाकारण फिरणारे यांना आपला खाक्या दाखविण्यास सुरुवात केली असून काल दोन जणावर कारवाई करण्यात आली तर काहींना जागेवरच शिक्षा देण्यात आली.

बेलापूरात कोरोनाचा रुग्ण सापडताच ग्रामस्थांनी कडक धोरण अवलंबविले विना मास्क फिरणा-याला दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते रुग्ण घरी आल्यामुळे गावात सर्व व्यवहार सुरळीत झाले असतानाच अनेक लोक विनाकारण टोळक्या टोळक्याने रस्त्यावर येऊ लागले. कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून जमू लागले.

याबाबतचे वृत्त प्रकाशित होताच पोलीस उपनिरीक्षक डी. बी. उजे, पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे, साईनाथ राशिनकर, निखिल तमनर, पोपट भोईटे, हरिष पानसंबळ यांनी गावात गस्त घालुन खुलेआम विनाकारण करणारांना चांगलेच फटकारले विना मास्क ट्रिपल सीट मोटार सायकलवर जाणा-यांना चौकातच उठबशा काढावयास लावल्या. त्यांनतर गावात अनेकांना दंडूक्याचा प्रसाद दिला.

सुनिल वैद्य हा विनाकारण फिरताना आढळून आला. याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल निखील तमनर यांनी दिली. तर पोलीस कॉन्स्टेबल पोपट भोइटे यांच्या तक्रारीवरुन एकलहरे येथील विशाल अल्हाट याचे विरुद्ध जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या आदेशाचे नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोघा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांच्या या कारवाईमुळे मोकाट फिरणा-यांना आळा बसेल हे नक्कीच.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here