प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाचा अखेर मुहूर्त ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्टला अयोध्या राम मंदिराचे भूमिपूजन करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पंतप्रधान कार्यालयाकडून 5 ऑगस्ट या तारखेबाबत सहमती देण्यात आली असली तरी हे भूमिपूजन प्रधानमंत्री प्रत्यक्ष अयोध्येला करतील का व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करतील याबाबत अद्याप एकमत नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 जुलै रोजी अयोध्येतील राम मंदिराचे भूमीपूजन करणार होते. दिल्लीतून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मोदी भूमीपूजन करणार होते. मात्र भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राम मंदिर ट्रस्टने भूमीपूजन आणि निर्माण कार्याला जून महिन्यात तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे अनिश्चित काळासाठी भूमीपूजन लांबणीवर पडले होते. मात्र अखेर श्रावणात राम मंदिर भूमिपूजनाचा मुहूर्त ठरला आहे.
अयोध्येतली माती 2 जून रोजीच दिल्लीला आणण्यात आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे ही माती स्वाधीन केली होती.