Breaking News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कोरोनाचा शिरकाव; अधिका-यासह सेवक चाळीतील दोघे बाधित

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कोरोनाचा शिरकाव झाला असून विद्यापीठातील अधिका-यासह सेवक चाळीतील दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. 

त्यामुळे विद्यापीठातील 4 इमारती 7 दिवसांसाठी सील करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या शिरकावानंतर विद्यापीठात अत्यावश्यक कामांशिवाय कुणीही येऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या शिवाय कर्मचारी, प्राध्यापक आणि अधिकाऱ्यांना ऑनलाईन कामांवर भर देण्यास सांगण्यात आलं आहे.

पुणे विद्यापीठाने विद्यापीठ परिसरातील कर्मचाऱ्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच विद्यापीठाबाहेरील व्यक्तींना अत्यावश्यक कामाशिवाय परिसरात येऊ नये असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here