ऊस उत्पादनात तयार होणाऱ्या कचऱ्यापासून बनवणार ‘बायोमास्क’

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा (Coronavirus) हाहाकार सुरुच आहे. या कालावधीमध्ये मास्क, ग्लोव्ह्जचा वापर वाढला आहे. दरम्यान या सर्व गोष्टींच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्याची समस्या देखील मोठी आहे. फेकण्यात आलेले मास्क, ग्लोव्ह्ज भविष्यात आणखी समस्या निर्माण करू शकतात. मात्र या समस्येवर देखील उपाय शोधण्यात येत आहे. दिल्लीतील एक कंपनी Effibar ने एक असा बायोमास्क बनवला आहे, जो ऊस शेती उत्पादनात निर्माण होणाऱ्या कचऱ्यापासून बनवला जातो. या मास्कचा 30 वेळा वापर करता येतो आणि त्यानंतर तुम्ही त्याला जमिनीवर जरी टाकले तरी तो डिकंपोज होतो.

 ग्रृपचे संस्थापक राजेश भारद्वाज यांनी अशी माहिती दिली की, बायोफेस मास्क एक बायोडिग्रेडेबल मास्क आहे. यामध्ये अँटी बॅक्टिरियाची क्षमता आहे. कारण हा मास्क पीएलएल कम्पाउंड आणि पॉलिएटिक अॅसिडपासून बनतो. म्हणूनच हा मास्क बायोडिग्रेडेबल आणि अँटी बॅक्टिरियल आहे. त्यांनी अशी माहिती दिली आहे की हा मास्क तुम्ही 30 वेळा धुवू शकता आणि त्याचा वापर करू शकता.

बायोमास्कचे फायदे

या बायोमास्कचा फायदा असा आहे की, जे आता रोज मास्क बदलण्याची आवश्यकता भासते, तसे करावे लागणार नाही. बायोमास्क निसर्गातील वस्तूंपासून बनतो आणि त्याचा वापर संपला की निसर्गामध्येच तो आपल्याला फेकून द्यायचा आहे. त्यानंतर तो डिकंपोज होईल. बायोमास्कची टेक्नॉलॉजी जपानच्या टीव्हीएम कंपनी लिमिटेडची आहे आणि Effibar ने त्यांच्याबरोबर करार केला आहे. कंपनी लोकलायझेशनवर लक्ष्य केंद्रीत करत आहे. इकॉनॉमी बायोमास्कची किंमत 145 ते 150 रुपये आहे तर प्रीमियम मास्कची किंमत 450 ते 500 रुपये आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here