प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

सोनई – हळूहळू कोरोनाचा प्रभाव दिसून येत असून आज सकाळी विळद येथील विखे पाटील रुग्णालयात दोन दिवसापासून उपचार घेत असलेल्या सोनई येथील एका ५५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे सोनईमध्ये कोरोनाचा दुसरा बळी गेला असून या मृत व्यक्तीची पत्नी देखील बाधित असून ती याच रुग्णालयात उपचारासाठी घेत आहेत.
या मृत्यूमुळे गावात कोरोनाची दहशत आणखी वाढली आहे. आरोग्य खात्याने सोनईत रॅपिड चाचणी घेण्यास सुरुवात केली असून यासाठी दोन स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. सूर्यवंशी यांनी दिली. या मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती स्वतःहून नगर येथे खाजगी रुग्णालयात चाचणीसाठी गेले आहेत.
दरम्यान, सोनईत बाधिताची संख्या आता २४ झाली असून ८२ जणांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. तर ३९ रुग्णाचे अहवाल प्रतीक्षेत असून आज येण्याची शक्यता आहे. दरम्यान, शंकरराव गडाख यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे तर त्यांंची पत्नी बाधित असून ते दोघेही मुंबई येथे उपचार घेत आहेत.