Sangamner : दरोड्याच्या तयारीतील दहा दरोडेखोराच्या मुसक्या आवळल्या; 23 लाखाच्या मुद्देमालासह हत्यारे जप्त 

0
दरोडेखोर उस्मानाबाद जिल्ह्यातील; दोघे फरार; सोन्याच्या दुकानावर टाकणार होते दरोडा
प्रतिनिधी | आश्वी | राष्ट्र सह्याद्री 
संगमनेर तालुक्यातील कोल्हार – घोटी राज्यमार्गावर असलेल्या चिंचपूर शिवारात दरोड्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोराच्या टोळीचा पाठलाग करुन आश्वी पोलिसांनी दोन दरोडेखोरांसह दोन मालवाहतूक ट्रक, एक मालवाहतूक पीकअप व घातक शस्त्रे असा सुमारे २३ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याचं दरोडेखोराच्या टोळीतील आणखी ८ जणांना, असे एकूण १० दरोडेखोर पकडले आहे. तर दोन आरोपी फरार झाले आहेत.
याबाबत पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास मी, पोलिस नाईक शांताराम झोडगे, आनंद वाघ, होमगार्ड अमोल सहाणे, माजी सैनिक दामोदर भोसले याच्या समवेत गस्त घालत होतो. यावेळी लोणी – संगमनेर रस्त्यावरील चिंचपूर शिवारात असलेल्या वृंदावन हाॅटेल समोर दोन मालवाहतूक ट्रक (एम. एच. १० ऐडब्ल्यू. ७१,) व (एम. एच. ४० बीएल ५५६९, तसेच एक पिकअप व्हॅन (एम. एच. २५ ऐजे २१४८) या तीन वाहनांमध्ये संशयास्पद हालचाली दिसल्याने आम्ही चौकशीसाठी तिकडे वळालो. परंतू पोलीस आपल्याकडे येत असल्याचे पाहून ट्रक मधील ८ ते ९ व पिकअप मधील दोघे अंधारात पळाले. त्यामुळे आम्ही पाठलाग करुन अरुण उर्फ बिभिषण काळे (वय – ३०, रा. कन्हेरवाडी फाटा, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) व समाधान शहाजी घुमरे (रा. आदोरा, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) या दोघांना पकडले.
यावेळी त्याच्या वाहनाची तपासणी घेतली असता लोखंडी कटर, धारदार सुरा, लोखंडी कटावण्या, गज अशी घातक हत्यारे मिळून आली. त्यामुळे पकडलेल्या दोघांकडे पळून गेलेल्याची माहिती विचारल्यानतंर त्यानी नाना भास्कंर ऊर्फ भाषा काळे, राहुल कालिदास काळे, बाबुशा भीमराज काळे, बिभिषण राजाराम काळे, रमेश लगमन काळे, सुभाष ऊर्फ हरी ऊर्फ दादा भास्कंर काळे, चदंर ऊर्फ चदंऱ्या भास्कर काळे, सुधाकर श्रावण भगत, नवनाथ बाळू काळे व बाबू अनिल शिदें सर्व कळंब तालुक्यातील (जि. उस्मानाबाद) हे रहिवासी पळाल्याचे सांगितले. त्यामुळे आम्ही लोणी व नगर नियत्रंण कक्षाला याबाबत माहिती दिली. यानतंर इतर आरोपीचा शोध घेतला असता कोल्हार (ता. राहाता) येथून नाना भास्कंर ऊर्फ भाषा काळे, राहुल कालिदास काळे व बाबुशा भिमराज काळे यांना ताब्यात घेतले. यावेळी आरोपीना पोलीसी खाक्या दाखवताच त्यांनी सोन्याच्या दुकानावर दरोडा टाकणार असल्याची माहिती पोलिसांना दिली.
दरम्यान, यावेळी नगर येथिल पोलीस नाईक सुनिल चव्हाण यांच्या पथकाने उरवर्रित पाच दरोडेखोराच्या मुसक्या आवळत त्याना आश्वी पोलीसाच्या ताब्यात दिले. त्यामुळे आश्वी पोलीस ठाण्यात या बारा आरोपी विरुध्द गुरंव नबंर १०६/२०२० भादंवी कलम ३९९, ४०२ तसेच भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तर दोन आरोपी फरार असल्याची माहिती दिली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर याच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here