संगमनेरकरांना दे धक्का कोरोना संक्रमणामुळे दोघांचा मृत्यू…तर आजची नवीन बाधित रुग्ण संख्या 11…

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

आज संगमनेरकरांना मोठा धक्का बसला. आज संध्याकाळी कोरोनाच्या संसर्गाने तालुक्यातील दोघांचे बळी गेले आहेत. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील कोरोना बळींची संख्या सोळावर जाऊन पोहोचली असून आज शहरातील सात व तालुक्यातील चार असे अकरा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संगमनेरातील कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होऊन ती 359 वर पोहोचली आहे.

आज सायंकाळी शहरालगतच्या कासारवाडीतून 87 वर्षीय व्यक्तीचा तर शिबलापूरमधील 43 वर्षीय व्यक्तीचा कोरोनाच्या विषाणूंनी बळी घेतला आहे.तर कासारवाडीतील बाधिताचा अहवाल प्राप्त होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील कोरोना बळींची संख्या 16 वर जाऊन पोहोचली आहे.

आज दिवसभरात कुरणमधील 16 वर्षीय बालिकेचा अहवाल आल्यानंतर आज सायंकाळी पुन्हा संगमनेर शहरातील अत्यंत गजबजलेल्या पार्श्वनाथ गल्लीतील 55 वर्षीय इसम, बाजारपेठ परिसरातील 65 वर्षीय इसम, उच्चभ्रु वसाहतींचा परिसर असलेल्या ऑरेंज कॉर्नर परिसरातून 60 वर्षीय महिला व 37 वर्षीय पुरुष, नाईकवाडपुरा परिसरातून 47 वर्षीय महिला, मालदाडरोड परिसरातील 43 वर्षीय व वीस वर्षीय पुरुषांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

त्यासोबतच तालुक्यातील राजापूरमधून 65 वर्षीय व्यक्ती, 44 वर्षीय महिला, कासारवाडीतून 87 वर्षीय व्यक्ती तर निमोण मधून 30 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव आला आहे. निमोण मधील महिला सलग दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. तर पॉजीटिव्ह रुग्णांची संख्या 359 वर जाऊन पोहोचली आहे.काल रात्री माळीवाडा परिसरातील वैद्यकीय व्यावसायिकासह तालुक्यातील वडगाव लांडगा येथील एकाला कोरोनाचे  संक्रमण झाले आहे.

दिवसेन दिवस कोरोना विषाणू धक्का देत आहे त्यामुळे संगमनेरकर हादरले असून त्यांच्या काळजीत भर पडली आहे तर नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. माळीवाडा परिसरातील वैद्यकीय व्यावसायिकासह वडगाव लांडगा येथील एकाला कोविडचे संक्रमण..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here