… शरद पवार तर श्रीराम द्रोही – उमा भारती

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

शरद पवार यांचे वक्तव्य मोदींविरोधी नाही तर प्रभू श्रीरामांच्या विरोधात आहे, ते तर रामद्रोही आहेत, असे वक्तव्य उमा भारती यांनी केले आहे.

श्रावणातील तिसऱ्या सोमवारी गणपतीची पूजा करण्यासाठी त्या भोपाळमधील प्राचीन गणेश मंदिरात गेल्या होत्या. यावेळी त्यांनी शरद पवारांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली.

शरद पवार यांनी काल सोलापूरचा दौरा केला. यावेळी श्रीराम जन्मभूमीच्या भूमिपूजनाच्या मुद्द्यावरून “आम्ही कोरोनाशी लढण्यावर उपाययोजना करत आहोत, पण मंदिर बांधून कोरोना जाईल असं काही जणांना वाटतं” असा टोला शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला होता.

या विधानावरून शरद पवार यांना ट्विटर वर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत होते. काही जण पवारांच्या बाजूला तर काही विरोधात गेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here