Ahmednagar Corona Breaking : कॅन्टोनमेंट बोर्डमधील पाच कर्मचाऱ्यांना कोरोना

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
नगर : कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनातील पाच कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्गाचे निदान झाले आहे. रॅपिड टेस्टमध्ये या कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजही काही कर्मचाऱ्यांची चाचणी होणार आहे. त्यामुळे आकडा वाढण्याची शक्यता आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनातील संसर्ग झालेले हे पाच कर्मचारी वेगवेगळ्या भागात राहणारे आहेत. केडगाव, सारसनगर, सावेडी, अलमगीर आणि नगर तालुक्यातील केतकी गावात हे कर्मचारी राहतात. या कर्मचाऱ्यांना नेमका संसर्ग कुठे झाला हे समजू शकलेले नाही. भिंगार शहरात कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे. साथरोग असल्याने तिला अटकाव करण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. आरोग्य आणि स्वच्छता विभागाचे संयुक्त पथक यासाठी कार्यरत आहे.
भिंगार शहरांमध्ये आतापर्यंत ४१ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा विभाग, जिल्हा परिषद, पोलीस मुख्यालय आणि आता कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या मुख्य कार्यालयात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here