फास्ट चार्जरवर अटॅक; फोन वितळणार, ब्लास्ट होणार

  0

  नवी दिल्ली – सध्या स्मार्टफोचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. मात्र अनेक ठिकाणी हॅकिंगच्या घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशातच स्मार्टफोन युजर्ससाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. फोनवर विविध प्रकारे हॅकर्स हे अटॅक करत असतात. पण आता एका विशिष्ट प्रकारच्या अटॅकच माहिती समोर आली असून यामध्ये फास्ट चार्जरवर हल्ला केला जात आहे. चीनच्या सिक्यॉरिटी रिसर्चर्सने फास्ट चार्जर्सच्या फर्मवेयर हल्ला केला जात असल्याची माहिती दिली आहे. यामध्ये कनेक्टेड डिव्हाईसचं मोठं नुकसान होत आहे.
  चार्जरशी कनेक्ट असलेल्या फोनमधील घटक वितळतात आणि त्याचा स्फोट होत असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. इरवझेुशी असं या अटॅकच्या टेक्निकचं नाव ठेवण्यात आलं असून र्दीरर्पुी ङरल च्या रिपोर्टमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. रिसर्चर्सने दिलेल्या माहितीनुसार, इरवझेुशी अटॅक फास्ट चार्जरचं फर्मवेयर करप्ट करतं. फास्ट चार्जर हे दिसायला सामान्य असतं. मात्र ते कमी वेळेत फोन लवकर चार्ज करतो.
  फास्ट चार्जरमध्ये असलेल्या एका विशेष फर्मवेयरच्या मदतीने ते काम करत असतं. फर्मवेअर कनेक्टेड डिव्हाईस सर्वप्रथम समजून घेतं आणि त्यानुसार चार्जिंगचा स्पीड ठरवतं. इरवझेुशी टेक्निक चार्जरच्या डिफॉल्ट चार्जिंग पॅरामीटर्समध्य काही बदल करतं. म्हणजेच चार्जर हे गरजेपेक्षा जास्त पॉवर फोनला देतं. त्यामुळेच फोन वितळू शकतो आणि त्याला आग लागून ब्लास्ट होऊ शकतो. हा अत्यंत खतरनाक अटॅक असल्याचं म्हटलं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
  काही महिन्यांपूर्वी फेसबुक, इन्स्टाग्राम युजर्सचा डेटा लीक झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याच दरम्यान आता आणखी एका व्हायरसचं सावट असल्याची मााहिती समोर आली आहे. धोकादायक आणि पॉवरफुल असलेला एक जुना व्हायरस तब्बल तीन वर्षांनी परतला आहे. धक्कादायक म्हणजे हा व्हायरस बँक डिटेल्स आणि वैयक्तिक माहिती सहज चोरू शकतो. फेकस्काय असं या मॅलवेअरचं नाव असून ऑक्टोबर 2017 मध्ये सापडला होता. त्यावेळी या व्हायरसने जपान आणि दक्षिण कोरियामधील लोकांना त्याचे लक्ष्य बनवले होते. मात्र आता उूलशीशरीेप छेर्लीीींर्पीी के रिसर्चर्स हा व्हायरस जगभरातील युजर्सना त्याचे लक्ष्य करत असल्याची माहिती दिली आहे.

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here