Shrigonda : म्हातार पिंपरी येथे खून; आरोपी स्वतःच पोलिस ठाण्यात हजर; अटकेची मागणी

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा तालुक्यातील म्हातार पिंपरी या ठिकाणी एकाचा खून करून आरोपी स्वतःच पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने पोलिसांकडे अटकेची मागणी केली. ही घटना आज सायंकाळी सात वाजता घडली. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

वाबळे नरेंद्र संभाजी असे मयताचे नाव आहे. तर राजू बबन शिरवळे हा आरोपी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरवळे ही व्यक्ती स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाली. त्याने घटनेची माहिती देऊन स्वतःला अटकेची मागणी केली. सुरुवातीला पोलिसांनी शिरवळे यांच्यावर विश्वस ठेवला नाही. मात्र नंतर घटनेचा खुलासा करण्यासाठी  पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव तसेच पोलीस निरीक्षक सतीश गावित हे घटनास्थळी पोहोचले.

त्यांनी घटनेचा पंचनामा केला. तर संबंधित इसमाला ताब्यात घेतले, अशी माहिती आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here