प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

नगर ः केडगाव भागातील भूषणनगर परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. तो रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने आज हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. हा परिसर 2 जुलैपर्यंत सील राहणार आहे. आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी हा आदेश काढला आहे.
केडगावमधील भूषणनगर, लिंकरोडवरील तिरुपती कन्स्ट्रक्शनचे कार्यालय, वावळके यांचे घर, राणी लक्ष्मीबाई चौकाजवळील वाळके यांचे घर, घोडके यांचे घर, आनंद प्रोव्हिजन स्टोअर्स, औताडे यांचे घर, गारूडकर यांचे घर, चव्हाण घर, तेजस एन्टरप्रायजेस ते महावीर कलेक्शन, सारंग निवास, संजीवनी क्लिनिक, वृंदावन पार्क झेंडा चौक ते तिरूपती कन्स्ट्रक्शनचे कार्यालयाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र राहिल.
दक्षिण बाजूस चर्च व गणपती मंदिर, शिवांजली मंगल कार्यालय, राहिंज मळा व परिसर, पश्चिमेस राममंदिर, श्रीकृष्ण कॉलनी, नम्रता रो-हौसिंग, अजिंक्य रो-हौसिंग, जिल्हा परिषद शाळा व परिसर, पूर्वेस लिंक रोडची पूर्व बाजू, रंगोली हॉटेल, दीपनगर, अयोध्यानगर व परिसर, उत्तरेस वृंदावन कॉलनी, स्वामी विवेकानंद चौक व माधवनगर परिसर बफर झोन राहणार आहे.
भूषणनगर या प्रतिबंधित क्षेत्रात जीवनावश्यक सेवा पुरविण्यासाठी राधेशाम कॉम्प्लेक्स शेजारील रस्ता रहदारीसाठी राहणार आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर फौजदारी कारवाई होणार आहे.