Kada : निमगाव चोभा येथील नदीत साडेतीन टन कोळसा जप्त

आष्टीच्या वनविभागाची बेधडक कारवाई
कडा – तालुक्यातील निमगाव चोभा परिसरातील कांबळी नदीत साठवून ठेवलेला जवळपास एकशे सत्तर गोण्या अनाधिकृत कोळसा जप्त करुन वनविभागाने दिलीप राठोड नावाच्या आरोपी विरुध्द गुन्हा केला आहे.
आष्टी तालुक्यात काही ठिकाणी वृक्षतोडीच्या घटना सातत्याने घडत असताना मंगळवारी (ता.१९) रोजी दुपारच्या सुमारास निमगाव चोभा परिसरातील कांबळी नदीकाठी वृक्षतोड करून कोळसा तयार करण्याच्या अनधिकृत भट्ट्या चालू असल्याची गोपनीय माहिती खब-याकडून वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार आष्टीचे वनपरिक्षेत्र अधिकारी शाम शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सी एम महाजन, वनरक्षक अनिल जगताप, बी.ए. शिंदे आदींनी नदीतील त्या घटनास्थळी छापा टाकून विक्रीसाठी लपवून ठेवलेला जवळपास १७० गोण्यातील अंदाजे साडेतीन ते चार टन कोळसा जप्त करण्यात आला.

याप्रकरणी आरोपी दिलीप श्रीराम राठोड (रा. वाघळूज, ता.आष्टी) याच्याविरुद्ध वनविभागाने गुन्हा दाखल केला आहे. लॉकडाऊनच्या कालावधित आतापर्यंत वनविभागाकडून अनाधिकृत वृक्ष तोडीचे चौदा गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती अधिका-यांकडून देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here