Karjat : आजच्या कोरोना बाधित रुग्णाचा दूर्दैवी मृत्यू; शहरातील रुग्णसंख्या 5 वर

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

कर्जत : कर्जत शहरातील एका जेष्ठ व्यक्तीचा सोमवारी (दि २०) कोरोना अहवाल सकारात्मक प्राप्त झाला असून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कर्जत शहरातील कोरोना बाधित रुग्णाची संख्या पाच झाली असून नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन कर्जत प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. प्रथमच कोरोनाने तालुक्यातील व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
सोमवार दि २० शहरातील एका ज्येष्ठ व्यक्तीचा कोरोनाने उपचार घेत असताना नगर येथे दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती तालूका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड यांनी दिली. कर्जत तालुक्यातील प्रथमच कोरोनाने बळी घेतला आहे. यापूर्वी राशीन येथे मुळची मुंबई येथील ६६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. कर्जत शहरात आता एकूण पाच व्यक्ती कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांनी विशेष खबरदारी घेणे अनिवार्य बनले असून कामा व्यतिरिक्त सर्वसामान्य नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here