Shirdi : नगरपंचायतचे स्वच्छता कर्मचारी साई संस्थानमुळे वाऱ्यावर

कोरोना प्रादुर्भावात त्यांच्यावर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

शिर्डी शहराच्या स्वच्छतेसाठी नगरपंचायतला साई संस्थानकडून देण्यात येणारे दरमहा सुमारे 42 लाख रुपये देणेच बंद केलेले असल्यामुळे नगरपंचायतच्या सुमारे 150 स्वच्छता कर्मचाऱ्यांना साई बाबा संस्थानने वाऱ्यावर सोडले असून त्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना कोरोना प्रादुर्भावात उपासमारीची वेळ शक्यता निर्माण झाली आहे.

शिर्डी शहरात मोठ्या प्रमाणात साई भक्त येत असल्यामुळे  शहरात मोठ्या प्रमाणात कचरा निघत असतो. ही बाब लक्षात घेवून तत्कालीन नगराध्यक्षा तथा विश्वसत्‍ योगिता शेळके यांनी स्वच्छतेपोटी साई संस्थानने स्वच्छता निधी द्यावा अशी मागणी केली होती. ही बाब लक्षात संस्थानचे तत्कालीन अध्यक्ष सुरेश हावरे यांच्या विश्वस्त मंडळाने शिर्डी शहर स्वच्छतेसाठी दरमहा 42 लाख 50 हजार रु. देण्याचे मंजूर केले होते. हे स्वच्छतेचे काम एका खाजगी ठेकेदारस देण्यात आले होते.

मार्च 15 नंतर देशभरात लॉकडाउन करण्यात आले. त्या दरम्यान सुमारे मे महीन्यापर्यंत संस्थानने निधी दिला. त्यानंतर अचानकपणे संस्थानने हा निधी नगरपंचायतच्या खात्यावर जमा केलेला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे माहे जून वेतन त्यांना मिळालेले नाही. यातुन त्यांना आता उपासमारीची वेळ येण्याची शक्यता दिसत आहे.

याबाबत नगरपंचायतच्या मुख्याधिकारी सतिश दिघे यांना विचारले असता ते म्हणाले की, त्यांनी नगरपंचायतच्या खात्यावर निधी वर्ग करणे गरजेचे आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतनही रखडले आहेत. मात्र संस्थानने जवळपास महीनाही उलटला तरीही निधी वर्ग केलेला नाही. याबाबत संस्थान हा निधी देणार आहेत का नाही. याबाबत नगरपंचायतकडे कोणताही पत्रव्यवहार केलेला नाही. त्यामुळे संस्थानची सध्याची भूमिका अस्पष्ट आहे. त्यामुळे पूढे स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येवू शकतो. असे दिघे म्हणाले.

संस्थानच्या सुत्रांकडून अशी माहीती मिळाली की, सध्या कोरोना सदृश्य स्थिती असल्यामुळे शिर्डीत साई भक्तच नाहीत. त्यामुळे शहरातील स्वच्छतेपोटी जो निधी दिला जात होता. तो तूर्तास स्थगित करावा. अशा निर्णय व्यवस्थापन समितीने घेतला आहे. मात्र हा निधी देण्यासंदर्भात होणाऱ्या बैठकीत ठेवला जाणार आहे. त्यानंतर समितीचा पुढील आदेश येईपर्यंत हा निर्णय तूर्त स्थगित ठेवण्यात आला. त्यामुळे स्वच्छता कर्मचारी सध्या तरी वाऱ्यावरच आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here