Shrirampur : कामगार रुग्णालयात कोविड सेंटर नको

जनतेची मागणी

श्रीरामपूर :तालुक्यामधील गोरगरिबांसाठी शहरातील साखर कामगार रुग्णालय व संत लूक रुग्णालय ही 2 हॉस्पिटल आहेत यामधील संत लूक हॉस्पिटलमध्ये कोविडं सेंटर आहे आता जर कामगार रुग्णालय कोविडं सेंटरला दिल्यास गोरगरीब जनतेने जायचे कुठे असा सवाल सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

कोविडं रुग्णांची वाढती संख्या बघता शहराची वाटचाल रेडझोन कडे चालली आहे, शहर रेड झोन झाल्यानंतर आणखी एक रुग्णालय कोविडं सेंटर म्हणून गरज लागणार आहे. यासाठी शहरातील एखादं खाजगी रुग्णालय कोविडं सेंटर म्हणून घ्यावे कारण साखर कामगार रुग्णालय मध्ये गोरगरीब रुग्णांसह ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी तसेच जिल्ह्यांमधील स्नेक बाईटचे प्रसिद्ध उपचार केंद्र म्हणून या रुग्णालयाचा लौकिक आहे.

त्यामुळे तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागातील जनतेने जर काही आपातग्रस्त प्रश्न निर्माण झाल्यास जायचे कुठे असा सवाल जनतेमधून होत आहे तरी साखर कामगार रुग्णालय कोविडं सेंटरला देऊ नये अशी मागणी आता नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here