Agriculture : मनसेच्या तोडफोडीच्या इशा-यानंतर प्रशासन जागे; उद्यापासून सर्वच कृषी केंद्रावर मुबलक प्रमाणात खते उपलब्ध

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

शेवगाव – खत पुरवठ्याच्या योग्य नियोजनाअभावी शेतक-यांची होणारा त्रास पाहता, शहर मनसेने कृषी सेवा केंद्रावर तोडफोड करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आता प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. उद्यापासून जवळपास सर्वच कृषी सेवा केंद्रावर खते व युरिया मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार आहे.

शहरासह तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने कृषी सेवा केंद्रासमोर खते घेण्यासाठी शेतक-यांनी रांगा लागल्या आहेत. यावेळी तालुका कृषी कार्यालय व कृषी सेवा केंद्र चालक यांनी खताच्या वाटपाचे योग्य नियोजन न केल्याने शेतकरी हवाल दिल झालेला आहे. या सर्व गोष्टीची दखल घेत मनसेचे शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे यांनी थेट तालुका कृषी कार्यालयात तोडफोड करण्याचा ईशारा शेवगाव तालुका कृषी अधिका-यांना दिला. याबाबतचे त्यांचे व तालुका कृषी अधिकारी यांचे मोबाईलवरील संभाषण महाराष्ट्रभर व्हायरल झाले. याची गंभीर दखल जिल्हा प्रशासनाने घेत तालुक्यात मोठ्या प्रमाणावर खते व युरिया उपलब्ध करून दिला आहे. उद्यापासून जवळपास सर्वच कृषी सेवा केंद्रात खते व युरीया मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार आहे. याबाबत जिल्हा प्रशासनासही रांधवणे यांनी संपर्क करत शेवगाव तालुक्यातील शेतक-यांसाठी खते व युरीयाचा मुबलक प्रमाणात पुरवठा करण्याची मागणी केली होती.

मागील वर्षी पावसाने दांडी दिल्याने तसेच नोटाबंदी, कोरोना महामारीचे संकट यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत  सापडलेला आहे. मात्र, तालुक्यातील सर्व मंडलात सुरूवातीलाच समाधानकारक पाऊस झाल्याने शेतक-यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तालुका कृषी कार्यालयाने मात्र योग्य नियोजन न केल्याने तालुक्यात खताचा व युरीयाचा तुटवडा निर्माण झालेला होता. यामुळे शहरातील व तालुक्यातील सर्वच कृषी सेवा केंद्रासमोर रांगा लागलेल्या आहेत.
यामुळे सामाजिक अंतर राखणे, मास्क वापरणे या सर्व गोष्टीचा फज्जा उडाला आहे. यात कृषी सेवा केंद्रचालकांना देखील फटका बसला असून शेवगाव नगरपरिषदेने याबाबत कारवाई करत कृषी सेवा केंद्रचालकांना दंड आकारला आहे.पंरतु योग्य नियोजन तालुका कृषी कार्यालयाने न केल्याने ही गर्दी वाढतच चाललेली आहे. शेतकरी ही आपल्याला खते व युरीया मिळेल की नाही या विवंचनेत सापडलेला आहे. यावर योग्य नियोजन करावे, अशी मागणी करत मनसेचे शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे यांनी तालुका कृषी कार्यालयातील अधिका-यांना काही सूचना करत याबाबत योग्य नियोजन करण्याचे सुचविले आहे.
आलेली सर्व खते व युरीया शेतक-यांना मुबलक स्वरूपात वाटप करावीत, अशी मागणी करत शेवगाव शहरातील विविध कृषी सेवा केंद्राच्या गोडाउनवर जात स्वतः व कृषी सहाय्यकांना सोबत घेऊन शिल्लक खते व युरियाचे शेतक-यांना वाटप केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here