कोरोना काळातील लुटमार थांबवा अन्यथा आंदोलन

0

मनसे शिरूर तालुका उपाध्यक्ष तेजस यादव यांचा इशारा
शिक्रापूर (प्रतिनिधी) : कोरोना महामारीच्या काळामध्ये प्रशासकीय अधिकारी व हॉस्पिटल मधून नागरिकांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होऊन आर्थिक लुटमार होत आहे. पैसे भरल्याशिवाय रुग्णांना दाखल करून घेतले जात नाही. यासह आदी प्रकार थांबवा, अन्यथा आरोग्य विभागाच्या उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन करू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माणसेनेचे शिरूर तालुका उपाध्यक्ष तसेच निमगाव म्हाळुंगीचे माजी उपसरपंच तेजस यादव यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
महाराष्ट्रासह सर्वत्र कोरोनाने थैमान घातलेले असताना आणि शासनाने प्रशासनाला कोरोना संदर्भातील गैरप्रकार रोखण्याचे आदेश दिलेले असताना देखील अनेक हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधित रुग्णांना उपचाराअभावी ताटकळत थांबविले जाते. डीपॉजीट रक्कम भरल्या शिवाय रुग्णांवर उपचार सुरु केले जात नाहीत. एकाच घरातील सर्व व्यक्ती होम क्वारंटाईन असताना त्या घरातील इसम कोरोना मुळे मयत झाल्यास पुढील कार्यवाही केली जात नाही. यांसह आदी बाबी घडत असून प्रशासन तसेच हॉस्पिटल मधून नागरिकांची लुट केली जात असल्याचे तेजस यादव यांनी म्हटले आहे.
तसेच या सर्व बाबी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊन देखील याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप तेजस यादव यांनी केला आहे. कोरोना बाधित रुग्णांना तातडीने दाखल करून घेत उपचार सुरु करावेत व लुटमार थांबवावी. अन्यथा आरोग्य विभागाच्या उपसंचालक कार्यालयासमोर झोपून आंदोलन करू अशा इशारा महाराष्ट्र नवनिर्माणसेनेचे शिरूर तालुका उपाध्यक्ष तेजस यादव यांनी दिला असून याबाबत आरोग्य विभागाचे उपसंचालक तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन दिले आहे.
शिरूर तालुक्यात रुग्णांसाठी सुविधा उपलब्ध नाही
शिरूर तालुक्यात देखील असंख्य कोरोना बाधित रुग्ण मिळून आलेले असताना आरोग्य विभागाकडे या रुग्णांना दाखल करण्याची सुविधा नाही. आरोग्य विभाग व प्रशासकीय यंत्रणेकडे कोविड हॉस्पिटलची यादी नाही, त्यावरून आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे देखील तेजस यादव यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here