रितेश-जेनेलियाचं व्यवसाय क्षेत्रात पदार्पण

मुंबई । कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव बघता सध्या देशभरासह राज्यात अनेक ठिकाणी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या काळात अनेक उद्योगधंदे हॉटेल व्यवसाय बंद झाले आहेत. अशातच सुप्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी एका नव्या व्यवसायाची मोर्चेबांधणी केली आहे. या दोघांनीही मिळून प्लान्ट बेस्ड मीट प्रॉडक्शन लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. रितेश आणि जेनेलिया यांच्या या नवीन प्रॉडक्शनमुळे सध्या त्यांच्या नावाची जोरदार चर्चा होत आहे.
रितेश आणि जेनेलियाने इमॅजीन मीट्स या नावाने नव्या प्रॉडक्शनची सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे हा जरी मांसाहारी पदार्थ वाटत असला तरीदेखील प्रत्यक्षात तो मांसाहारी पदार्थ नसून शाकाहारी पदार्थ असतो. केवळ त्याला मांसाहारी पदार्थाचं रुप दिलं जातं. प्लान्ट बेस्ड मीट प्रॉडक्शनमध्ये पालेभाज्या किंवा अन्य शाकाहारी पदार्थ मांसाप्रमाणे भासतील या पद्धतीने तयार केले जातात. विशेष म्हणजे जेनिलिया शुद्ध शाकाहारी आहे. त्यामुळं मासाहारीचा स्वाद शुद्ध शाकाहारीमध्ये घेता यावा यासाठी त्यांनी हे नवीन प्रॉडक्शन सुरु केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here