सोन्याच्या भावात दिवसेंदिवस होतेय वाढ, जाणून घ्या कुठे आणि किती करावी गुंतवणूक

एका गुंतवणूकदाराचा पोर्टफोलियो त्यात सोन्याचा समावेश असल्याशिवाय संतुलित दिसत नाही. प्राचीन काळापासूनच सोने हे अनिश्चिततेपासून वाचण्याचे तसेच महागाईचा सामना करणारे साधन मानले जाते. सध्याच्या परिस्थितीत भारतासोबतच वैश्विक अर्थव्यवस्थाही कठीण काळातून जाते आहे. अशावेळी आपल्या पोर्टफोलियोत सोने असल्याने आपल्याला बाजारातील अत्याधिक जोखीम आणि अनिश्चिततेचा सामना करण्यात मदत मिळू शकते. बाजारात उपलब्ध असणार्‍या अनेक सोन्याच्या गुंतवणुकींपैकी आपल्यासाठी सर्वात योग्य अशी गुंतवणूक आपण निवडायला हवी. जाणूघ्या आपल्या सोयीसाठी सोन्याच्या गुंतवणुकीबद्दल काही महत्वपूर्ण गोष्टी
गेल्या काही दिवसांत सोन्याची किंमत 50,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर गेली आहे. 9 जुलै 2020 रोजी सोन्याची किंमत 49,175 रुपये प्रति ग्रॅम होती. 6 ऑगस्ट 2015 रोजी हीच किंमत 24,562 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. याचा अर्थ असा की गेल्या 5 वर्षांत सोन्याची किंमत जवळजवळ दुप्पट झाली आहे. याशिवाय 2019मध्ये सोन्याची सगळ्यात कमी किंमत 31,220 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. यावरून लक्षात येते की ही किंमत एक वर्षात जवळपास 60% वाढली आहे. स्थानिक तसेच वैश्विक बाजारातही जोखीम सातत्याने वाढल्यामुळे ही किंमत अचानक वाढली आहे. 1 जानेवारी 2020 रोजी याची किंमत 38,977 रुपये प्रति 10 ग्रॅम होती, पण गेल्या सहा महिन्यांत कोरोना व्हायरसच्या जागतिक संकटामुळे आलेल्या आर्थिक मंदीमुळे हीच किंमत आता 50,000 रुपयांच्या आसपास पोहोचली आहे. येत्या महिन्यांमध्ये परिस्थिती सामान्य न झाल्यास ही किंमत आणखी वाढण्याची शक्यता आहे.
सोन्याच्या किंमतीच्या वाढत्या कलामुळे हा गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय झाला आहे. अनेक लोक प्रत्यक्ष सोने, उदाहरणार्थ सोन्याचे दागिने, विटा आणि नाण्यांमध्ये गुंतवणूक करणे पसंत करतात, पण कोरोनाच्या काळात यात गुंतवणूक करणे काहीसे जोखमीचे ठरू शकते. याशिवाय घडणावळ, जीएसटी आणि या गोष्टी सांभाऴून ठेवण्याचा खर्च याचे रिटर्न्स कमी करतात. सोन्याच्या डिजिटल गुंतवणुकीत गोल्ड इटीएफ हा एक चांगला पर्याय आहे, कारण याला डीमटेरियलाईज्ड स्वरूपात ठेवता येते. हे सहजपणे विकता येते, पण ही गुंतवणूक खूप अधिक काळासाठी केल्यास यावर काहीही कर सवलत मिळत नाही. गोल्ड लाँग-टर्म कॅपिटल गेन्सवर इंडेक्सेशन बेनेफिट्ससोबत 20% कर लागू होतो.
आरबीआय तर्फे जारी केला जाणारा सॉव्हरिन गोल्ड बाँड एसजीबी ही देखिल एक डिजिटल गोल्ड इन्व्हेस्टमेंटच आहे. यात सोन्याच्या फेस व्हॅल्यूवर वर्षाकाठी 2.5% व्याज मिळते, जे इतर गोल्ड इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट्समध्ये मिळत नाही. हे विकताना याच्या कॅपिटल गेन्सवर नव्हे, तर आयकर कायद्याच्या तरतुदींनुसार फक्त व्याजाच्या रकमेवर कर लागू होतो. इतर गोल्ड इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट्समध्ये हा फायदा मिळत नाही. एसजीबी हे स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टेड असतात आणि पैशांची गरज असताना गुंतवणूकदार हे सेकंडरी मार्केटमध्ये विकू शकतात.
सोन्यामध्ये एकाच वेळी गुंतवणूक करण्याऐवजी थोडी थोडी गुंतवणूक करा. सध्या भारतात सोन्याची किंमत सर्वाधिक आहे. यावेळी एकदाच गुंतवणूक केल्याने भविष्यात किंमत कमी झाल्यास नुकसान होऊ शकते. यात डिजिटल पध्दतीने दर महिन्याला किंवा दर तीन महिन्यांना एक ठराविक रक्कम गुंतवणे फायद्याचे आहे. यामुळे आपल्या खिशावर जास्त ताण येणार नाही. लांबच्या भविष्यात आपल्या सोन्याच्या गुंतवणुकीवर रुपी कॉस्ट अ‍ॅव्हरेजिंग बेनेफिट्स मिळतील. आपण डॠइ मध्ये स्टॉक मार्केटच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकता किंवा वेळोवेळी ठइखतर्फे लाँच केले जाणारे डॠइ इश्यूज सबस्क्राईब करू शकता. ऋध20-21 सीरिज 4 लॉट, 10 जुलै 2020ला संपले आहेत, ज्यांची इश्यू प्राईज 4852 रुपये प्रति ग्रॅम होती आणि डिजिटल पद्धतीने पैसे भरणार्‍या ऑनलाईन सबस्क्रायबर्सना 50 रुपये प्रति ग्रॅमच्या दराने जास्तीची सूट मिळाली होती. पुढचा लॉट (ऋध20-21 सीरीज 5), 3 ते 7 ऑगस्ट 2020पर्यंत सबस्क्राईब केला जाऊ शकतो.
प्रत्येक इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्टचे एक उद्दिष्ट असते. काही फायदा मिळवून देतात, तर काही स्थिरतेची हमी देतात. गुंतवणुकीतली जोखीम नियंत्रित करत निर्धारित वेळेच्या मर्यादेत आपले आर्थिक लक्ष्य पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची गुंतवणूक करण्याला इन्व्हेस्टमेंट स्टॅटेजी म्हणतात. आपली रिटर्न्सची अपेक्षा, जोखीम घेण्याची क्षमता, वय, उत्पन्न आणि पैशांची गरज हे सर्व लक्षात घेऊन तयार केलेल्या उत्तम इन्व्हेस्टमेंट डायव्हर्सिफिकेशन स्टॅटेजीचा एक भाग म्हणून सोन्यातही गुंतवणूक करावी. पण ही गुंतवणूक आपल्या पोर्टफोलिओ व्हॅल्यूच्या जास्तीत जास्त 10% असावा, कारण कधीकधी वाढता कल असला तरी दीर्घ काळासाठी सोन्याची किंमत तशीच राहू शकते. पोर्टफोलियोमध्ये पुरेशा प्रमाणात सोन्याची गुंतवणूक असल्यास बाजाराची परिस्थिती खराब असताना आपल्या पोर्टफोलियोतील विविधता आणि स्थिरता कायम राहते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here