Breaking News : गुप्तधनासाठी घरात खोदकाम, मांत्रिकांसह घरमालक ताब्यात

2

मंगळवेढा येथील प्रकार; आरोपींमध्ये श्रीगोंद्या व अहमदनगर येथील एक जण

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – गुप्त धनच्या आशेने चोरून पूजा पाठ करणे घरमालकासह दोन मांत्रिकांना महागात पडली असल्याची घटना नुकतीच घडली आहे. गुप्तधनासाठी घरात खोदकाम करणाऱ्या दोन मांत्रिक व घरमालकासह तीन जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. आसपास असलेल्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे सदर प्रकार उजेडात आला आहे. यात प्रकरणात श्रीगोंदा येथील एक व अहमदनगर मधील एका व्यक्तीच्या समावेश असल्याचे समजते आहे.

सविस्तर माहिती अशी की, मंगळवेढा शहरातील इंगळे गल्लीत एका जुन्या वाडयात अमावास्येच्या तोंडावर सोन्याचा हंडा असल्याच्या समजावरून तिघेजण बंद वाड्यात खोदकाम करत असतांना आवाजाने आसपासचे लोक खडबडून जागे झाले. आवाजाच्या दिशेने वाडयात बारकाईने पाहिले असता, एक मांत्रिकासह अन्य दोघे खड्डा खोदून त्याची पूजा पाठ करीत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी नागरिकांनी सतर्कता दाखवीत पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्या तीघांना ताब्यात घेतले आहे.

अनेक वर्षापासून बंद वाडयात मंगळवेढा येथील एक स्थानिक व्यक्तीसह, श्रीगोंदा येथील एक व्यक्ती दुसरी व्यक्ती अहमदनगर अश्या तिघे जणांनी नमूद ठिकाणी सोन्याचा हंडा असल्याच्या संशयाने खोदाई करीत होते. खोदकामाचा बंद वाडयातून मोठयाने आवाज येत असल्याने वाडयाच्या शेजारील नागरिकांना आवाजाचा संशय आला. सगळे लोक घराबाहेर धावले व त्यांनी घरावर चढून वाकून पाहिले असता अंदाजे ३ बाय ३ चा ५ फुट खोलीचा खड्डा दिसून आला. त्या शेजारी नारळ फोडल्याचे व हळद-कूंकू व इतर विधीचे साहित्य पडल्याचे दृष्टीस आले. हा वाडा अनेक वर्षापासून कुलूपबंद अवस्थेत आहे.या मांत्रिकाने वाडयाच्या बाहेर एका व्यक्तीस नजर ठेवण्यासाठी उभे केले होते. दार लावून आत विधीचा कार्यक्रम सुरु होता.सदरील घटना दिनांक १९ जुलै रोजी घडली आहे.

नागरिकांनी पोलिस स्टेशनला तक्रार केल्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी येऊन तिघांना पोलिस स्टेशनला घेऊन गेले तर बाहेर नजर राखत उभा असलेली ती व्यक्ती मात्र फरार होण्यात यशस्वी झाली.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here