Ahmednagar Corona Breaking : अबब! जिल्ह्यात एकाच दिवशी 428 रुग्ण

2

कोरोनाचा समूह संसर्ग; प्रशासन हतबल; चार जणांचा मृत्यू

वाचा, कोणत्या तालुक्यात कोणत्या भागात किती रुग्ण 

नगरः  जिल्ह्यात आता कोरोनाचा उद्रेक झाला आहे. आतापर्यंतची कोरोनाग्रस्तांची उच्चांकी नोंद जिल्ह्यात बुधवारी झाली. यापूर्वीचा ३४१ रुग्णवाढीचा उच्चांकही मोडला गेला. त्यामुळे जिल्ह्यात चिंतेचे वातावरण  आहे. चाचण्यांचे प्रमाण वाढले, तसे रुग्णसंख्या वाढायला लागली असून आता क्षमतेच्या दुप्पट रुग्णांवर उपचार करताना प्रशासनाची तारांबळ उडाली आहे.  कोरोनामुळे जिल्ह्यात एका दिवसांत चाैघांचा मृत्यू झाला.

जिल्हा रुग्णालयाची कोरोना चाचणी प्रयोगशाळेत तसेच अँटीजेन चाचण्या आणि खासगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेले असे मिळून एकूण ४२८ रुग्णांची नोंद झाली. कोरोना चाचणी प्रयोगशाळेत ८४ जणांचे अहवाल बाधित आढळले. अँटीजेन चाचणीमध्ये ४४ जण बाधित आढळले, तर खासगी प्रयोगशाळेत केलेल्या अहवालात होकारात्मक आढळून आलेल्या आणि आयसीएमआर पोर्टलवर नोंद झालेल्या तीनशे रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामुळे उपचार सुरू असलेल्या एकूण रुग्णांची संख्या आता एक हजार २८१ इतकी झाली असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार २९१ इतकी आहे. जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या आता २६२० इतकी झाली आहे.

मंगळवारी सायंकाळपासून आज दुपारपर्यंत  रुग्ण संख्येत ७० ने वाढ झाली.  त्यानंतर पुन्हा १४ रुग्णांचे अहवाल बाधित आढळून आले. त्यामुळे २४ तासात ८४ रुग्ण बाधित आढळून आले. यामध्ये, संगमनेर तालुका २५, पारनेर तालुका एक, श्रीगोंदे तालुका १५, नगर शहर १३, नगर ग्रामीण २२, श्रीरामपूर तीन, राहुरी एक, अकोले दोन, कर्जत दोन अशा रुग्णांचा समावेश आहे. नगर  शहरातील स्‍टेशन रोड, सावेडी, सारडा गल्‍ली, सावेडी, केडगाव, पंचपीर चावडी, सिद्धार्थ नगर, नगर शहर मध्यवस्ती आदी भागात हे रुग्ण आढळून आले. संगमनेर शहरातील नगर रोड, मालदाड रोड, रायते, निमगाव जाळी, नांदूर दुमाला (8), पिंपळगाव डेपा (3), शिबलापूर (2),घास बाजार (4),बाजारपेठ (2) घुलेवाडी (२) असे २५ रु्ग्ण आढळले.

नगर ग्रामीणमध्ये २२ रुग्ण आढळले. त्यात बु-हाणनगर (16), ब्राम्‍हण गल्‍ली (भिंगार), नागरदेवळे, टाकळी खातगाव (4), राहुरी (1), कात्रड

श्रीरामपूर शहरात तीन आढळले.

पारनेर तालुक्यात पाडळी दर्या एक, श्रीगोंदे तालुक्यात देवदैठण, हिंगेवाडी, बेलवंडी (४) काष्टी (५), चिकलठाणवाडी (१), निमगाव खलू (१)

कर्जत (2) निंबोडी, कोळवडी असे १५ रुग्ण आढळले. अकोले शहरात दोन रुग्ण आढळले. अँटीजेन चाचणीत आज ४४ जण बाधित आढळले. त्यात, श्रीरामपूर तीन, नेवासे सहा, कोपरगाव दोन, संगमनेर २१, कॅन्टोन्मेंट चार, नगर शहरात तीन आणि राहाता तालुक्यात पाच अशा रुग्णांचा समावेश आहे.

कोरोनामीटर

…………………

उपचार सुरू असलेले रुग्ण- १२८१

बरे झालेले रुग्ण- १२९१

मृत्यू- ४८

एकूण रुग्ण संख्या-२६२०

जिल्ह्यात ५८ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

………………..

चाैकट २

दोन दिवसांत दहा बळी

……………………

जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या जशी वाढत आहे, तशीच कोरोनामुळे होणा-या मृत्यूंची संख्या ही वाढली आहे. सोमवारी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३८होती, ती आता दोन दिवसांत ४८ झाली आहे.

*कोरोना टेस्ट लॅबमध्ये २४ तासात ८४ बाधित*

*अँटीजेन चाचणीत जिल्ह्यात आढळले ४४ बाधित*

*खाजगी प्रयोगशाळेत बाधित ३०० रुग्णांची एकूण रुग्ण संख्येत नोंद*

*उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या झाली १२८१*

*जिल्ह्यातील १२९१ रुग्ण बरे होऊन गेले घरी*

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here