Karjat : कोरोना पार्श्वभूमीवर बकरीद ईद साध्या पद्धतीनेच साजरी करणार 

2

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

कर्जत : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर नमाज घरी अदा करणार असल्याचे कर्जत येथील मुस्लिम समाजाने सांगितले आहे. कर्जत पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
यावेळी उपस्थित मुस्लिम समाजाच्या पदाधिकारी शांतता समिती सदस्य यांना उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बकरी ईद शासनाने दिलेल्या नियम व अटीच्या अधीन राहून साजरी करण्याचे आवाहन केले असता उपस्थितांनी आम्ही सर्व नियम अटी पाळून प्रशासनास सहकार्य करू, असे आश्वासन देऊन नमाज आणि कुर्बानी ही घरी करून ईद साध्या पद्धतीने साजरी करू असे सांगितले.
यावेळी पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड़, गुप्तवार्ताचे पोकॉ. मनोज लातुरकर मौलाना अखलाख अहमद, रज़्ज़ाक झारेकरी, अय्यूब बेग, मुस्ताक सय्यद, इलियास पठाण, अय्याज बेग, समशेर शेख, माजिद पठाण, शरीफ पठाण, आमीन झारेकरी आदि. उपस्थित होते.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here