‘मी डोनाल्ड ट्रम्प नाही’ – उद्धव ठाकरे

  0

  प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

  “मी म्हणजे डोनाल्ड ट्रम्प नाही. माझ्या डोळ्यांसमोर माझी माणसं तळमळताना पाहू शकत नाही”, असं उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत सांगितले आहे.

  शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची  मुलाखत घेतली आहे. त्याचा टिझर सामनाच्या यु ट्यूब चॅनलवर प्रदर्शित केला आहे. ही मुलाखत 25 आणि 26 जुलैला प्रदर्शित होणार आहे.

  या मुलाखतीत अनेक प्रश्नांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिशय रोखठोक उत्तरे दिली आहेत. “हे सहा महिने विविध आव्हांनाचे होते. कोरोना संकट अजूनही संपता संपत नाही. हे रण कधी सरणार? हेच कळत नाही”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

  तर अंतिम वर्षाच्या परीक्षांवरही त्यांनी सविस्तर भाष्य केले आहे. पण या विषयावर ते काय म्हणाले हे प्रत्यक्ष मुलाखतीतच समजणार आहे.

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here