Kada : राजेंद्र जैन यांची “महाराष्ट्र गौरव” पुरस्कारासाठी निवड

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

कडा येथील पत्रकार राजेंद्र जैन यांच्या प्रेरणादायी लिखाणाची दखल घेऊन त्यांची “महाराष्ट्र गौरव” या राज्यस्तरिय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

राज्यभरात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींची निवड करून अशा व्यक्तींना मागील पाच वर्षापासून जळगाव ( खान्देश ) येथील सेवक सेवाभावी संस्थेकडून महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात येते. कोरोना सारखी भयावह परिस्थिती हाताळण्यासाठी मागील चार महिन्यापासून आरोग्य, महसूल, पोलिस, शिक्षण इत्यादी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह सफाई कामगारांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सामाजिक दायित्व दाखवून जे योगदान दिले.

त्या योद्ध्यांसाठी पत्रकार राजेंद्र जैन यांनी प्रोत्साहनपर व समाजात जनजागृती होण्याच्या दृष्टीने सातत्याने लिखाण केले होते. त्याच कार्याची दखल घेत, सेवक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष विशाल शर्मा, सचिव रंजनाताई शर्मा, निवड समितीच्या रजनी दरेकर यांनी दखल घेऊन राजेंद्र जैन यांची महाराष्ट्र गौरव राज्यस्तरिय पुरस्कारासाठी निवड केली आहे. या निवडीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here