Karjat : कोरोना साखळी तोडण्यासाठी नगरपंचायतच्या ‘या’ उपाययोजना

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

कर्जत : दिवसा-दिवस कर्जत शहरात कोरोना रुग्णाची संख्या वाढत असून त्याची साखळी तोडण्यासाठी कर्जत नगरपंचायतीच्यावतीने सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध उपाय योजना राबविण्यात येत आहे. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे. तसेच नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी पथक कार्यान्वित करण्यात आले असून त्याची अंमलबजावणी गुरुवारपासूनच करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, नगरसेवक सचिन घुले यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना मुख्याधिकारी जाधव म्हणाले की, मागील आठवड्यात कर्जत शहरात कोरोना बाधित रुग्ण आढळला असून त्याच्या संपर्कातील आणि नव्याने एकूण सहा रुग्ण शहरात आढळले आहेत. त्याची साखळी तोडण्यासाठी शहर लॉकडाऊन करण्यात आले आहे. यावेळी सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्य तपासणी मोहीम कर्जत नगरपंचायतद्वारे राबविण्यात येत असून नागरिकांनी त्यास सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.
यामध्ये शारीरिक तापमान, प्लस तपासणी करण्यात येणार आहे. पावसाळ्यात डेंगू, मलेरिया या साथीच्या रोगांना अटकाव करण्यासाठी प्रभागात धूर फवारणी मोहीम राबविण्यात येत आहे. शहरातील शासकीय कार्यालय, दवाखाने, खाजगी दवाखाने यांचे नियमित निर्जंतुकीकरण करण्यात येईल. कोरोना बाधीत रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तीची माहिती आरोग्य विभाग घेत असुन यापुढे त्याचा प्रसार होऊ नये म्हणून अप्रत्यक्ष संपर्कात आलेल्या व्यक्तीची माहिती नगरपंचायत घेऊन त्यांना होम कोरोन्टाईन करण्याची भूमिका राबवित असल्याची मोहीम हाती घेण्यात येत आहे. अशा व्यक्तीच्या घरावर होम कोरोन्टाईन पत्रक लावण्यात येईल. बाहेर पडताना मास्क न बांधणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, सामाजिक अंतर न ठेवणे गर्दी करणे अशा नियमांचे पालन न करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम कडक करण्यात येईल.
शहरात व्यापारी दुकाने उघडे असताना त्यांना प्रत्येक ग्राहकाचे नाव आणि संपर्क नंबर पत्यासह सक्तीने नोंद करावी. तसेच ज्या दुकानांत गर्दी दिसेल त्यावर कारवाई करण्यात येईल. प्रतिबंधित क्षेत्रातील व्यक्तींनी बाहेर पडू नये तसेच बाहेरील व्यक्तीने त्या परिसरात प्रवेश करू नये. यासाठी नगरपंचायतीने कर्मचाऱ्याची नियुक्ती केली असून त्या क्षेत्रातील नागरिकांना अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तू पुरवठा करण्यासाठी नगरपंचायत बांधील असल्याची ग्वाही दिली. यावेळी यावेळी नगरसेवक तारक सय्यद, डॉ संदीप बरबडे, अजय भैलुमे, संतोष मेहत्रे, सतीश समुद्र, ओंकार तोटे यांच्यासह नगरपंचायत अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी नगरपंचायत बांधील – उपनगराध्यक्ष नामदेव राऊत

कर्जत शहरात कोरोना रुग्ण आढळल्याने त्याची साखळी तोडण्यासाठी शहरातील प्रत्येक कुटुंबाची आरोग्य तपासणी नगरपंचायत प्रशासनाद्वारे करण्यात येणार आहे. त्या तपासणीमध्ये काही खबरदारी घेण्याची आवश्यकता निर्माण झाल्यास अशा नागरिकांना आरोग्य विभागाकडे वर्ग करण्यात येईल. यावेळी नागरिकांनी कर्जत नगरपंचायतीस सहकार्य करावे, असे आवाहन उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले. यासह पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात सर्वसामान्य नागरिकांना काही अडचण निर्माण झाल्यास त्यांनी प्रभाग निहाय नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्याना संपर्क करीत आपली मागणी नोंदवावी ती तात्काळ पूर्ण करण्याची ग्वाही नगरपंचायतीद्वारे दिली. 
नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी कटीबद्ध – नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे
कर्जत शहरात कोरोना साखळी तोडण्यासाठी सात दिवसाचा जनता कर्फ्यु पुकारण्यात आला आहे. या काळात नागरिकांना येणाऱ्या समस्या व अडचणी त्यांनी अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी संपर्क करत पूर्ण करावे. त्यासाठी कर्जत नगरपंचायत कटीबद्ध असून नागरिकांनी कसलीही भीती मनात बाळगू नये असे आवाहन नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे यांनी सांगितले. 

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here