Shirdi : कोरोनाची साखळी थांबेना, आज आढळले सात रुग्ण

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

साईबाबांच्या शिर्डीत कोरोनाची साखळी थांबण्याचं काही नाव घेत नाही. गुरूवारी प्रशासनाकडून पाठविण्यात आलेल्या ३० स्वॅबपैकी तिघेजण बाधित असून चार जण एकाच कुटूंबातील खासगी तपासणीतून समोर आलेले आहे. त्यामुळे शिर्डीची धाकधूक ही कायमची वाढतीचं राहिल्याचे दिसून आलं आहे. आजपर्यंत शिर्डीत सुमारे ७८ रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे.

गेल्या पंधरा दिवसापासून शिर्डीत कोरोनाने विळखा घातलेला आहे. तो शिर्डीत सैल होण्याची चिन्ह काही दिसत नाही. मात्र प्रशासनाने चांगलीच कंबर कसली असल्याने त्यांचा शोध घेऊन स्वब पाठविण्याचे काम तातडीने केले जात आहे. त्यामुळे कोरोनाच्या कहराला सामोरे जाण्याची वेळ तरी कोरोनावर नाही. शिर्डी सध्या लॉकडाउन आहे. सामाजिक अंतराच ही पालन होत आहे. प्रशासनाच्या कामाचा वेग पाहता शिर्डीकर लवकरच मोकळा श्वास घेतील, असा विश्वास देखील प्रशासनाने व्यक्त केला आहे.

गुरुवारी घेण्यात आलेल्या स्वॅबमध्ये शिवसेनेचे एक नेतेही कोरोना बाधित झालेले आढळून आलेले आहे. त्यांच्या कुटुंबातील स्वॅब घेऊन चाचणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यामुळे शिर्डीत एकीकडे चिंता वाढण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here