Shrigonda : ‘सुविधा द्या कर घ्या’ – शाहूनगर परिसरातील नागरिकांची भूमिका

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा शहरातील प्रभाग क्र २ मधील शाहूनगर येथील सुमारे दीड ते दोन हजार लोकवस्ती असलेल्या ठिकाणी नागरी सुविधांपासून वंचित असल्याने गेली ५ ते १० वर्षांपासून नगरपरिषद याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याने राजकीय पुढारी मतांसाठी पालिकेचे कर्मचारी कर वसुलीसाठी येतात. मात्र, नागरिकांना ड्रेनेज रस्ते दिवाबत्तीची सोय नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने सुविधा दिल्या तरच कर वसूल करा, असा पवित्रा तेथील नागरिकांनी घेतला आहे. 

श्रीगोंदा नगरपरिषदेचा प्रभाग क्र २ मध्ये शाहूनगर शिक्षक कॉलनी बीएसएनएल ऑफिस परिसर या सर्व ठिकाणी मिळून सुमारे दीड ते दोन हजार लोकवस्ती आहे. नगरपरिषदेच्या माध्यमातून या ठिकाणच्या नागरिकांकडून नियमित विविध प्रकारचे कर आकारणी केली जात आहे. मात्र, तेथील नागरिकांना ड्रेनेज लाईनची पालिकेने सुविधा न केल्याने लोकांचे सांडपाणी एकमेकांच्या दारात येऊन मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच या परिसरात नगरपरिषदेने रस्ते केले नसल्यामुळे दरवर्षी पावसाळयात ठिकठिकाणी पाण्याचे डबके तयार होऊन मोठ्या प्रमाणात चिखल होत असल्याने दोन चाकी अथवा चार चाकी गाडी चालवण्यास नागरिकांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे. तसेच दिवाबत्तीची सोय केली नसल्यामुळे परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. नगरपालिका फक्त कर आकारणी करण्यात धन्यता मानत असल्यामुळे नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यास टाळाटाळ करते. नगरपरिषदेला कोट्यावधी रुपयाचा निधी मिळतो. तरीही नागरिकांना मिळत नसल्यामुळे नागरिकांतून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.
प्रभाग क्र २ मधील शाहूनगर हा परिसर माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक मनोहर पोटे व नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांचा हा बालेकिल्ला म्हणून ओळख आहे. तर माजी नगराध्यक्षा सुनीता खेतमाळीस याही सध्या याच प्रभागाच्या नगरसेविका आहे आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस यांचे चिरंजीव नगरसेवक गणेश भोस याच प्रभागातून निवडून आले आहेत. हे दिग्गज पदाधिकारी याच प्रभागातून नेतृत्व करत असले तरीही या भागातील नागरिकांना सुविधांपासून वंचित ठेवले असल्यामुळे या सर्व नेत्यावर तेथील जनता नाराज आहे.
प्रभागात पत्येक निवडणुकीच्या वेळेस सर्व राजकीय पदाधिकारी येथील मतांसाठी जनतेच्या पदस्पर्श करून आश्वासनांचा पाऊस पाडतात. मात्र, निवडून आले की गायब होतात. या प्रभागात सध्या पावसामुळे गवत वाढल्यामुळे डासाची पैदास मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे या भागात फॉगिंग करणे गरजेचे असताना अनेक वेळा नगरपरिषदेस कळवूनही आज अखेर फवारणी केलेली नाही. येत्या आठ दिवसात या भागात फवारणी व ड्रेनेजची सोय केली नाही तर नगरपालिकेच्या समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा श्रीगोंदा भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस दीपक शिंदे यांनी दिला आहे.
याबाबत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे याच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले कि मी नुकताच कामावर रुजू झालो आहे त्या भागाची पाहणी करतो आणि तेथील समश्या सोडविण्याचा प्रयत्न करतो असे त्यांनी सांगितले
या प्रभागातयेत्या दोन ते दिवसात रस्त्यावर मुरूम टाकण्यात येईल तसेच ड्रेनेजचे कामही काही दिवसात सुरु होईल त्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे आणि ड्रेनेजचे काम पूर्ण झाल्यावर रस्ते तयार करण्यात येणार आहेत, असे  नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here