Shevgaon : वाघोली परिसरात अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया 

2
प्रातिनिधिक छायाचित्र
तूर, कापूस, बाजरी, सोयाबीन, पिकांचे अतोनात नुकसान
शेवगाव – तालुक्यातील वाघोली व परिसरातील गावात काल दिनांक 23 जुलै रोजी अतिवृष्टी झाली असून त्यात तुर कापूस बाजरी सोयाबीन पिकांचे अतोनात नुकसान झाले असून पूर्ण खरिप वायला गेलेले आहे. शेवगाव तालुक्यात पावसाचे प्रमाण सरासरी असले तरी ढोरजळगाव मंडळात गेल्या आठवडाभरापासून सातत्याने अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे वाघोली गावातील रस्तेही मोठ्या प्रमाणावर वाहून गेले रस्त्यांवर सर्वत्र मोठे खड्डे पडलेले आहेत.
त्यामध्ये वाघोली येथील मीर वाट, वाघोली-माका रस्ता, वाघोली-शिंगवे रस्ता, वाघोली-दातीर वस्ती रस्ता तसेच सानटवस्ती रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था होऊन काही ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत. क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे असलेल्या वाघोली गावामध्ये मागील बऱ्याच दिवसापासून  रस्त्यांची मागणी दुर्लक्षित आहे. तरी खासदार सुजय विखे व आमदार मोनिक राजळे यांनी त्वरित लक्ष खालून रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावावा, लोकसभा व विधानसभा या निवडणुकीत वाघोली ग्रामस्थांनी मोठया प्रमाणात मताधिक्य दिले आहे. तरी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी व आमदार- खासदारांनी या पिकांची पाहणी करून पंचनामे करावेत.
तसेच आमदार-खासदार व सत्ताधाऱ्यांनी या रस्त्यांची दुरावस्था दूर करण्यासाठी प्रयत्न तसेच नुकसानग्रस्त खरीप पिकांची योग्य नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी वाघोली गावचे युवा नेते उमेश भालसिंग सरपंच बाबासाहेब गाडगे दादासाहेब जगदाळे सर, सुभाष दातीर किशोर शेळके सोपान पवार शरद पवार योगेश भालसिंग बाळासाहेब भालसिंग संदीप शेळके अशोक ढाणे या शेतकऱ्यांनी केली आहे.

2 COMMENTS

  1. Thank you so much for giving everyone an exceptionally brilliant opportunity to read critical reviews from this website. It’s usually so nice plus jam-packed with a great time for me and my office mates to visit your website more than thrice per week to learn the fresh items you have got. And definitely, I am always impressed for the very good hints you serve. Selected 2 ideas on this page are undeniably the best we have all had.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here