Shrigonda : Rashtra Sahyadri news impact : शाहूनगरला नगरसेवकांसह अधिका-यांची पाहणी; ड्रेनेजचे काम तात्काळ सुरू करण्याचे आश्वासन

दैनिक राष्ट्र सह्याद्री या वृत्ताची दखल घेत मनोहर पोटे गणेश भोस संतोष खेतमाळीस व मुख्याधिकारी मंगेश देवरे हे शाहूनगर मध्ये पाहणी करताना 

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा शहरातील प्रभाग क्र २ मधील शाहूनगर येथील सुमारे दीड ते दोन हजार लोकवस्ती असलेल्या ठिकाणी नागरी सुविधांपासून वंचित असल्याने गेली ५ ते १० वर्षांपासून नगरपरिषद याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याने राजकीय पुढारी मतांसाठी पालिकेचे कर्मचारी कर वसुलीसाठी येतात. मात्र नागरिकांना ड्रेनेज रस्ते दिवाबत्ती ची सोय नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे वृत्त आज दि २४ रोजी दैनिक राष्ट्र सह्याद्रीमध्ये प्रतिद्ध होताच या वृत्ताची दखल घेत शाहूनगरमध्ये नगरसेवक मनोहर पोटे, नगरसेवक गणेश भोस, संतोष खेतमाळीस व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी पाहणी करून मुरूम व ड्रेनेजचे तात्काळ काम चालू करण्याचे नागरिकांना आश्वासन दिले. 

श्रीगोंदा नगरपरिषदेचा प्रभाग क्र २ मध्ये शाहूनगर शिक्षक कॉलनी बीएसएनएल ऑफिस परिसर या सर्व ठिकाणी मिळून सुमारे दीड ते दोन हजार लोकवस्ती आहे. नगरपरिषदेच्या माध्यमातून या ठिकाणच्या नागरिकांकडून नियमित विविध प्रकारचे कर आकारणी केली जात आहे. मात्र, तेथील नागरिकांना ड्रेनेज लाईनची पालिकेने सुविधा न केल्याने लोकांचे सांडपाणी एकमेकांच्या दारात येऊन मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
याबाबतचे वृत्त दैनिक राष्ट्र सह्याद्रीमधून प्रसिद्ध होताच नगरपरिषदेला खडबडून जाग आली आणि या वृत्ताची दखल घेत शाहूनगरमध्ये नगरसेवक मनोहर पोटे नगरसेवक गणेश भोस, संतोष खेतमाळीस व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे व कर्मचारी यांनी पाहणी करून मुरूम व ड्रेनेजचे तात्काळ काम चालू करण्याचे नागरिकांना आश्वासन दिले.
प्रभाग क्र २ ची पाहणी मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी केल्यानंतर त्यांनी सांगितले की ड्रेनेज आणि रस्त्याच्या कामाचे लगेच इस्टिमेट तयार करून त्यासाठी लवकरच विशेष आर्थिक तरतूद करण्यात येईल व कामाला सुरुवात करण्यात येईल, असे सांगितले.
नगरसेवक मनोहर पोटे नगरसेवक गणेश भोस, संतोष खेतमाळीस यांनी या प्रभागाची पाहणी केल्यानंतर मनोहर पोटे यांनी सांगितले की ड्रेनेजच्या कामासाठी निधी दोन दिवसात वर्ग होईल वर्ग झाल्यावर ड्रेनेजचे काम तात्काळ सुरु करण्यात येईल. तसेच या भागातील विद्यूत प्रवाह भूमिगत करण्यासाठी उप अभियंता चौघुले यांना संपर्क साधून चर्चा केली आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here