प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
शेवगाव शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना शहरातील नागरिकांना मुलभूत सुविधा देण्यस नगर परिषद अपयशी ठरत आगे. नागरिकांना त्वरित मुलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अन्यथा येत्या ५ ऑगस्टला शहरातील क्रांती चौकात घंटानाद आंदोलन करण्यात येईल, अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते कमलेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय काँग्रेस पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि शाहू, फुले, आंबेडकर, साठे, कलाम सामाजिक विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने लेखी निवेदनाद्वारे नगरपरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंबादास गर्कळ यांना देण्यात आले आहे.
या निवेदनात शहरातील विविध ठिकाणी साचलेल्या पाणी डबके स्वच्छ करा. पिण्याच्या पाण्याचा नियमित पाणी पुरवठा करावा, प्रत्येक प्रभागात औषध फवारणी करावी. घरपट्टी पाणी पट्टी वसुलीला तात्पुरती स्थगिती द्यावी. महात्मा फुले भाजी मंडई शेतकरी व भाजीपाला विक्रेत्यांना विना मोबदला खुले करण्यात यावे आदी मागण्या केल्या आहेत.
निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते कमलेश लांडगे, काँग्रेस तालुकाध्यक्ष अमोल फडके, काँम्रेड संजय नांगरे, क्रुष्णा सातपुते, प्रविण भारस्कर,अशोक शिंदे आदींच्या सह्या आहेत.निवेदनाच्या प्रति तहसीलदार, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, पोलिस निरीक्षक यांना पाठविण्यात आले आहेत.