Rahuri : तालुक्यात सोमवारपासून डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर

प्रातिनिधिक छायाचित्र

वाचा सविस्तर माहिती

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री       

राहुरी कारखाना येथील विवेकानंद नर्सिंग होममध्ये डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सोमवार पासून सुरू करण्यात येणार आहे. यासंबधी प्राचार्य डॉ.विलास कड यांनी सांगितले की नर्सिंग होममध्ये कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. नर्सिंग होममध्ये २ वार्डची तयारी करून ठेवली आहे. प्रशासकीय पातळीवर रुग्ण पाठवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत शासकीय वाद्यकीय अधिकारी, नर्सिंग होमचे सर्व अधिकारी कर्मचारी कोविड सेंटर साठी सहकार्य करणार आहे, असे डॉ. कड यांनी सांगितले.

देवळाली प्रवरा नगरपालिका क्षेत्रात एकूण १३ रुग्ण सापडले असून त्यापैकी ४ रुग्णांवर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. संपर्कात आलेल्या ७० नागरिकांना क्वारंनटाईन करण्यात आले आहे.

देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीतील कोरोना पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी अजित निकत यांनी नागरिकांना जाहीर आवाहन केले आहे की नागरिकांनी सामाजिक अंतर, मास्क वापर करावा देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीत राहुरी कारखाना आजपर्यंत १३ रुग्ण कोरोना बाधित निघाले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी सामाजिक अंतराचा वापर करावा कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांनी बाहेर पडू नये. नागरिकांनी स्वतःला घशात व इतर कोणताही त्रास झाल्यास प्राथमिक वैद्यकीय अधिकारी यांना संपर्क साधावा, असे आव्हान निकत यांनी केले आहे.

येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आण्णासाहेब मासाळ यांनी सांगितले की नगरपालिका हद्दीत १३ रुग्ण कोरोना बाधित आढळले असून ४ रुग्णांवर उपचार करून सोडण्यात आले आहे. कोरोना बाधित रुग्ण उपचाराला प्रतिसाद देत आहे. रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ७० नागरिकांना कृषी विद्यापीठ येथे क्वारंनटाईन करण्यात आले आहे. बाधित रुग्णांपैकी देवळाली प्रवर येथील एका वस्तीवरील रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार चालू आहे. कंटेन्मेंट झोन मधील नागरिक संपर्कात आल्यानंतर स्त्राव तपासणीसाठी सहकार्य करीत आहे. नागरिकांनी संपर्कात आल्यानंतर स्वतःहून पुढे आले पाहिजे, असे आवाहन डॉ. मासाळ यांनी केले आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here