Rahuri : दूध दरवाढीसाठी रिपाइंचे तहसिलदारांना निवेदन

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

राहुरी – कोरोना कालावधीत दूधउत्पादक शेतकऱ्यांना दूधदराचा सामना करावा लागत असून आर्थिक हानी सहन करण्याची वेळ आली आहे. तसेच जनावरे जगवायची कशी व दूधधंदा चालवायचा कसा, असा प्रश्न पडला आहे. या पार्श्वभूमीवर दूधउत्पादक शेतकऱ्यांच्या भावना व हाल शासन दरबारी पोहचविण्यासाठी तसेच दुधाला दरवाढ व अनुदान मिळण्यासाठी रिपब्लिकन पार्टी अॉफ इंडिया (ऐ.) च्या वतीने राहुरी तहसिलदार यांना निवेदन सादर करण्यात आले.

रिपाइंचे उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात व राहुरी तालुकाध्यक्ष विलास नाना साळवे यांच्या नेतृत्वाखाली दिलेले निवेदन निवासी नायब तहसिलदार गणेश तळेकर यांनी स्वीकारले.

दुग्धउत्पादक शेतकरी यांची व्यथा व दुधदरवाढीच्या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दूधउत्पादकांना ३५ ते ४० रुपये दरवाढ मिळून अनुदान ५ ते १० रुपये मिळावी, कोरोना काळात दुधउत्पादक शेतकरी संकटात सापडला असून लॉकडाऊन झाल्यानंतर दुधाचे दर कोसळून दुधउत्पादकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊनआधी दुधाचे दर ३५ ते ४० रुपये होते. आज मात्र तेच दर १७ ते २० रुपयात आले आहेत.

या पार्श्वभूमीवर सरकारने दुधाच्या दरात वाढ करावी व दुधउत्पादकांना दिलासा द्यावा दूधदर वाढ करत दुधाला ३५ रुपये भाव मिळून अनुदान ५ ते १० रुपये द्यावे. रिपब्लिकन पार्टी अॉफ इंडीया (ऐ) संपूर्णपणे दूधउत्पादकांच्या पाठीशी असून दूधदरवाढीसाठी राज्यशासनाने त्वरित कारवाई करावी व अडचणीत सापडलेल्या दूधउत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अन्यथा राज्यभरात रिपाइं दूधदरवाढीसाठी आक्रमकपणे लोकशाही मार्गाने आंदोलन करील याची सरकारने दखल घ्यावी.

तहसिलदारांना दिलेल्या निवेदनावर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, तालुकाध्यक्ष विलास साळवे, जिल्हानेते बाळासाहेब जाधव, अतुल त्रिभुवन, नंदू सांगळे, संदीप गायकवाड, सागर संसारे, सोमनाथ भागवत, आर.आर.जाधव, सचिन पवार सह आदींच्या सह्या असून प्रसंगी सोशल डिस्टन्सचा नियम पाळत रिपाइंचे कार्यकर्ते उपस्थित होते.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here