Sangamner : अबब! तालुक्याची पॉझिटिव्ह रुग्ण संख्या पाचशेच्या जवळ पास…

8

प्रतिनिधी | विकास वाव्हळ | राष्ट्र सह्याद्री 

संगमनेर तालुक्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसागणिक झपाट्याने वाढ होत आहे. काल सायंकाळी 22 तर आज सकाळी चार नव्या रुग्णांची भर पडली आहे. आता तर कोरोनाचे विषाणू शहरा पाठोपाठ तालुक्यातील नवनवीन विभागात दररोज प्रवेश करीत आहेत. त्यामुळे आजही तालुक्याच्या रुग्णसंख्येत चारची भर पडल्याने बाधितांची संख्या 482 वर जाऊन पोहोचली आहे.

या महिन्यात मागील काही दिवसांपासून संगमनेर शहर व तालुक्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत एकसारखी वाढ होत आहे. या महिन्याच्या एक तारखेला 109 रुग्णसंख्या असलेल्या संगमनेर तालुक्यात अवघ्या 22 दिवसांत 373 रुग्णांची भर पडल्याने संगमनेरकरांच्या काळजीत भर पडली असून आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. कोविडच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी प्रशासनाकडून दिलेल्या सूचनांचे पालन हा एकमेव उपाय असल्याने त्याचे प्रत्येकाने या सूचनांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.

आज सकाळी जिल्हा प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या अहवालात संगमनेर शहरातील अशोक चौकातून 32 वर्षीय तरुण, शहरालगतच्या अभंगमळा तेथील 24 वर्षीय तरुण,तालुक्यातील रुग्णसंख्येत ही आज दोनची भर पडली. त्यात घुलेवाडीतील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक तर जोर्वे येथील 30 वर्षीय तरुण कोरोनाच्या संक्रमणात सापडला आहे.

संगमनेरमध्ये काल(गुरुवारी) संध्याकाळी पुन्हा एकदा कोरोनाने कहर केला असून एकूण 22 रुग्णांचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यात कासारा दुमाला या गावात एकाच वेळी 8 रुग्ण सापडले त्यात 43, 40, 67, 38, 10, 38, 14 वर्षीय पुरुष असून 12 आणि 67 वर्षीय महिला आहेत. मालदाड रोड येथे 52 व 53 वर्षीय महिला, गणेशनगर येथे 15 वर्षीय तरुण व 39 वर्षीय महिला, जनतानगर येथे 32 व 48 वर्षीय पुरुष, जेधे कॉलनी येथे 66 वर्षीय महिला तर उशिरा आलेल्या अहवालात काल रात्री नवीन नगर रोड येथे 35 वर्षीय महिला, पदमनगर येथे 17 वर्षीय तरुणी, भारतनगर येथे 80 वर्षीय महिला, गुंजाळवाडी पठार येथे 40 वर्षीय महिला, वाघापूर येथील 38 वर्षीय महिला, दाढ खुर्द येथील 25 वर्षीय पुरुष अश्या एकूण 22 जणांचा कोरोना अहवाल पॉसिटिव्ह आला आहे. त्यात आज सकाळीच चारने वाढ होवून रुग्ण संख्या 482 वर जावून पोहोचली आहे.

प्रशासनाकडून वारंवार आवाहन केले जावूनही सामान्य नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याने रुग्ण संख्या दिवसागणित वाढत आहे.नागरिकांनी आतातरी सावध व्हावे अन्यथा कोरोनाचा धोका वाढतच जाईल.असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

8 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here