Shirurkasar : दोन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडल्याने शहर बंद

बारगजवाडी, वारणी केले सिल

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
 
शिरूरकासार – निरंक झालेला शिरूरकासार तालुक्यात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले असून सुरूवातीला बारगजवाडी या ठिकाणी कोरोना पॉझिटिव सापडलेले जोडपे बरे झाले. अन् पुन्हा त्याच गावात एक जोडपे पॉझिटिव्ह निघाले विशेष म्हणजे याच शिरूरकासार शहरात ग्राहक सेवा केंद्र असल्याने बुधवारी शिरूर शहर तसेच तालुक्यातील बारगजवाडी, वारणी ही गाव कडकडीत बंद होती.
जिल्ह्यात कोरोनाचा आकडा झपाट्याने वाढत चालला असून आठ दिवसात तिनच्या गुणाकार पद्धतीने वाढल्याने साडेचारच्या जवळ जाऊन पोहचल्याने जिल्ह्याची चिंतेत मोठी भर पडली. परंतु शिरूरकासार तालुक्याच्या आकडा दोन तिनच्या पुढे गेलाच नाही शेजारच्या तालुक्यामुळे धाकधूक होती. परंतु मंगळवारी घेतलेल्या स्वॅबमध्ये अगोदर सापडलेल्या बारगजवाडीमध्ये पुन्हा ही नवरा बायको हे जोडपे पॉझिटिव सापडल्याने खळबळ उडाली.
विशेष म्हणजे यांचे शिरूरकासार शहरात ग्राहक सेवा केंद्र असून सध्या पिक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची झुंबड उडाली असल्याने त्यांचा मोठा संपर्क आला असल्याने जे या ठिकाणी गेले आहेत. त्यांनी स्वतःहून क्वारंटाईन होऊन त्रास झाल्यास तात्काळ शिरूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करावी, असे तालुका आरोग्य अधिकारी अशोक गवळी
यांनी अवाहन केले.
या बाबतीत तहसीलदार बेंडे यांना विचारले असता जिल्हाधिकारी जाहीर करतील, असे सांगून शहर बंद बाबतीत नगर पंचायत, आरोग्य विभाग हे कळवतील असे सांगून वेळ निभावून नेली असली तरी तहसीलदार बेंडे हे शिरूरकासार तातुक्याचे आपत्कालीन व्यवस्थापन समितीचे ते प्रमुख आहेत हे ते विसरले आहेत.

तसेच तालुक्यातील वारणी या गावचा एक जण जालना या ठिकाणी कामानिमित्त असताना त्याला कोरोना झाला हे कळताच
त्याने पलायन करून गाव गाठले. परंतु घरच्यांना काहीच सांगितले नाही. जालन्याचे पोलीस घरी आल्यानंतर ही माहिती  गावकऱ्यांना कळाली. त्यामुळे गावकऱ्यांनी कडकडीत बंद ठेवला.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here