Shirurkasar : तालुक्यात पावसाचा कहर ; खरिपाची सर्व पिके पाण्यात; शेतकरी हैराण

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री

शिरूरकासार – तालुक्यातील तिनही मंडळ मधील अनेक गावामध्ये गेल्या आठ दिवसापासून रोजच जोरदार पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी हैराण झाला असून गुरूवारी रात्री झालेल्या जोरदार पावसाने तर कहरच केला आहे. खरिपाची सर्वच पिके पाण्यात दिसत असल्याने रोजच्या पावसाला शेतकरी कंटाळून पुरता घाबरला आहे.

ऊन्हाळा जनतेनी कसाबसा लॉकडाऊनमध्ये घातला. तद् नंतर पावसाळ्यात सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आर्थिक परिस्थिती नसतानाही आर्थिक खाईत असताना कशातरी खरिपाच्या पेरण्या केल्या कापूस, तुर, सोयाबीन, बाजरी, भुईमूग, मूग या सह काही पिके घेतली चांगल्या झालेल्या पावसाने ही पिके बहरली परंतु गेली आठ दिवसापासून तालुक्यातील रायमोहा मंडळातील रायमोहा, खालापुरी, खोकरमोहा हिवरसिंगा, लिंबा, खांबा, पौंडुळ, जांब, शिरापुरगावाात , आर्वी तिंतरवणीमध्येे
फुलसांवी , निमगाव,तिंतरवणी, येळंब नांदेवाली शिरूरकासार व परिसरातील अनेक गावे अशा तिनही मंडळाच्या अनेक गावांना पावसाचा फटका बसत असून पाऊस रोजच्या रोज जोरदार पडत असल्याने नदी नाले तलाव तुडुंब भरली असली तरी खरिपाची सर्वच पिके पाण्यात आहेत. त्यामुळे अजून एक दोन
दिवस पाऊस असाच राहिला तर खरिपाची पिके गेल्यातच जमा समजायचे त्यामुळे शेतकरी घाबरला असल्याने हवाहवासा वाटणारा पाऊस नुकसानीच्या दिशेने वाटचाल करू लागल्याने सध्यातरी नको नकोसा वाटू लागला आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here