Crime : BreakingNews : ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचारी निवासस्थानात, मुलीचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्‍न..

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – ग्रामीण रुग्णालयामधील परिचारिकेची नातेवाईक असलेल्या एका मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज घडली आहे. ही परिचारिका श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालय येथे कार्यरत असून, तिची वीस वर्षांची भाची त्यांच्याकडे राहायला होती.

आज दिनांक २४ जुलै रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास या परिचारिकेच्या भाचीने घरातील पंख्याला सुताची दोरी गळ्याभोवती बांधून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रकार तिच्या आत्याच्या निदर्शनास आल्यानंतर त्या मुलीच्या गळ्याची दोरी सोडून शेजाऱ्यांच्या मदतीने तिला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती समजल्यावर पीडितेचे संबंधित श्रीगोंद्यात आले. त्यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. परंतु, मुलगी शुद्धीवर आल्यानंतर याबाबत तिचा जबाब घेऊन पोलीस गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

ही घटना घडण्यामागे नेमके कोणते कारण आहे ? याविषयी माहिती मिळू शकली नसली. तरी, मुलीचे संबंधित या विषयी पोलिसांकडे सविस्तर बोलले असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले आहे. पीडित मुलीच्या नातेवाइकांनी सांगितल्याप्रमाणे मुलीची तब्येत उपचाराला प्रतिसाद देत नसल्याची माहिती मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here