Shrigonda : प्रेमात फसगत झाल्यामुळे गळफास घेतलेल्या ‘त्या’ तरुणीचा अखेर मृत्यू

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – विवाहित प्रियकराकडून फसवणूक झाल्यामुळे हा धक्का सहन न झाल्याने एका 20 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना काल (दि24) दुपारी ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदा येथे घडली. 

गळफास घेतलेल्या तरुणीवर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु उपचारादरम्यान आज (दि25) पहाटेच्या सुमारास या तरुणीचा मृत्यू झाला. मयत तरुणीच्या नातेवाईकाच्या फिर्यादीवरून आरोपी धनंजय विष्णुपंत कांबळे रा जेवळी ता लोहारा जि उस्मानाबाद याच्याविरोधात अत्याचाराचा, तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या आरोपीसह त्याचा भाऊ विजय विष्णुपंत कांबळे व त्याची पत्नी यांच्याविरोधात देखील मयत मुलीला दोषी ठरवून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी मात्र कालच फरार झाला आहे. मयत तरुणी ही सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील आहे. सध्या ती श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात आपल्या नातेवाईकांकडे राहत होती. तर आरोपी धनंजय हा जामखेड येथे एका बँकेत कर्मचारी आहे. आरोपीचा भाऊ हा श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात कामाला आहे तर मयत तरुणीचे नातेवाईक देखील ग्रामीण रुग्णालयात कामाला आहे.

आरोपी हा भावाकडे आल्यानंतर त्याची भावाच्या घरासमोर राहणाऱ्या या तरुणीशी ओळख झाली. त्या ओळखीचे मैत्रीत आणि मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने या तरुणीशी शारीरिक संबंध ठेवले. परंतु अखेर आरोपीचे बिंग फुटले आपला प्रियकर हा विवाहित असल्याचे तरुणीला समजले. त्यानंतर तरुणीने या विवाहित प्रियकराला शरीरसंबंधास नकार दिला. पण वासनांध आरोपीने या तरुणीचा मानसिक शारीरिक छळ करायला सुरुवात केली. फसवणूक झाल्यामुळे या तरुणीने अखेर आपली जीवनयात्रा संपवली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पो निरीक्षक विठ्ठल पाटील हे करत आहेत.

5 COMMENTS

  1. I think other site proprietors should take this website as an model, very clean and excellent user genial style and design, let alone the content. You’re an expert in this topic!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here