Sangamner : आज वाढले 11 नवे कोरोना रुग्ण; कोरोनाचा आणखी एक बळी….??

2

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

संगमनेर शहरात कोरोनाचा धुमाकूळ सुरूच असून आज दुपारी पुन्हा 11 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याचा अहवाल प्रशासनास प्राप्त झाला आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ही 494 वर जाऊन पोहचली आहे. त्यामुळे आज ही कोरोनाने संगमनेरकरांना जोराचा दे धक्का दिला आहे. तर आज पुन्हा तालुक्यतील एका ज्येष्ठ महिलेचा बळी गेल्याची चर्चा असून त्यास मात्र प्रशासनाकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.

प्रशासनास आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार संगमनेर शहरातील इंदिरानगर येथे 20 वर्षीय तरुणी, बाजारपेठ येथील 14 वर्षीय मुलगा, देवीगल्ली येथील 18 वर्षीय तरुणी, पद्मनगर येथील 24 वर्षीय तरुणी, घास बाजार येथील 55 वर्षीय महिला, घोडेकर मळा येथील 27 वर्षीय तरुण असे एकूण सहा तर तालुक्यातील कासारा दुमाला 31, 65, 29 वर्षीय पुरुष व 47 वर्षीय महिला आणि वडगाव लांडगा येथील 36 वर्षीय महिला असे पाच अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आज एकूण 11 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे संगमनेरच्या रुग्ण संख्येची वाटचाल पाचशेच्या जवळ जाऊन पोहचली आहे. त्यामुळे संगमनेरकरांच्या काळजीमध्ये भर पडली आहे.

तालुक्यातील राजापूर येथील एका महिलेचा कोरोनाने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून प्रशासनाकडून यास अधिकृत दुजोरा देण्यात आला नाही. या महिलेची पहिली टेस्ट पॉझिटिव्ह होती. परंतु अँटीजन टेस्ट निगेटिव्ह होती. त्यामुळे हा मृत्यू कोरोनात मोजायचा आहे की नाही याबाबत प्रशासनामध्ये साशंकता व्यक्त केली जात आहे. तर नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. नागरिकांनी आता तरी सतर्क राहणे गरजेचे आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here