पोटासाठी लाठीकाठीची कसरत दाखवणा-या शांताबाईंना गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट

  0

  एक लाख रुपयांची दिली मदत

  कोरोनामुळे सध्याची परिस्थिती वाईट आहे. अनेकांवर पोटाची खळगी भरण्यासाठी वेगवेगळी कसरत करावी लागत आहे. अशाच पोटाची खळगी भरणा-या पुण्यातील 85 वर्षांच्या आजीबाई शांताबाई पवार या पुन्हा एकदा लाठीकाठीच्या खेळ घेऊन रस्त्यावर उतरल्या.

  सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओ प्रसिद्ध झाले आहेत. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांची भेट घेतली. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून एक लाखांची मदत देण्यात आली. तसेच नऊवारी साडी-चोळी देऊन त्यांचा सन्मानही केला. याबाबत देशमुख यांनी ट्विट करून माहिती दिली.

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here