Shrirampur : खून प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पसार; पोलीस व्हॅनमधून मारली उडी 

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
 
श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगाव येथे दि.७ मे रोजी सासरा व जावई यांच्यात किरकोळ वादातून झालेल्या भांडणात जावयाचा खून झाल्याची घटना घडली होती. यातील चार आरोपींना पोलिसांनी २४ तासाच्या आत पकडून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला होता. या चारही आरोपींना काल दि. २५ जुलै रोजी तपासणीसाठी शिरसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते. तपासणीनंतर त्यांना पोलीस व्हॅनमधून तालुका पोलीस ठाण्याकडे घेऊन जात असताना यातील दोन आरोपी पोलिसांना चकवा देऊन पोलीस व्हॅनमधून उडी मारून पसार झाले. त्यानंतर त्यातील एक आरोपी शिरसगाव येथे एका उसाच्या शेतात मिळून आला, तर खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सचिन काळे हा प्रसार झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगांव येथे सासरा व जावयाच्या वादातून दि.७ मे रोजी रात्री ९ ते १० च्या दरम्यान सोन्याच्या दागिन्याच्या मागणीवरून सासरा व जावई यांच्यात वाद झाला होता. हा वाद विकोपाला जाऊन या वादामध्ये जावई मयूर आकाश काळे याचा सासरा सचिन काळे, संदीप काळे, सुरज काळे, बुंदी भोसले या चौघांनी मिळून दगड व लोखंडी पाईपने खून केला होता. या आरोपींना श्रीरामपूर तालुका पोलिसांनी २४ तासाच्या आत अटक करून या आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता ते श्रीरामपूर तालुका पोलिसांच्या ताब्यात होते. या आरोपींना काल दि.२५ रोजी शिरसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले होते.

तपासणीनंतर परत जात असताना यातील दोन आरोपींनी पोलिस व्हॅनमधून उडी मारून पसार झाले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने पसार आरोपींचा शोध सुरू केला. यातील एक आरोपी हा शिरसगाव येथे एका उसाच्या शेतात मिळून आला. मात्र खुनाच्या गुन्ह्यात मुख्य आरोपी असलेला सचिन काळे अद्यापपर्यंत पसार असून त्याचा श्रीरामपूर तालुका पोलीस शोध घेत आहेत. त्यासाठी श्रीरामपूर तालुका पोलीसांची टिम रवाना करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here