Shrigonda : हिरडगाव येथे बारा ते तेरा लाखाची चोरी; चोरीमध्ये चोरांची झाली दिशाभूल !

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथे भास्कर आबासाहेब भुजबळ (भुजबळ वस्ती) यांच्या घरी आज रात्री दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास मोठी चोरी झाली. सुमारे वीस तोळ्याचे दागिने आणि अडीच लाख रुपये रोख, असा १२ ते १३ लाख रुपयांचा ऐवज चोरांनी लांबविला.

चोरट्यांनी दरवाजा कटावणीने उघडून घरात प्रवेश केला. घरातील झोपलेल्या लोकांना ओलांडून कपाटामध्ये असणारा हा सर्व ऐवज चोरट्यांनी लांबविला. रात्री दोन अडीचच्या दरम्यान हिरडगावच्या भुजबळ वस्तीवर भास्कर आबासाहेब भुजबळ यांच्या घरी झालेल्या चोरीमध्ये काही बेन्टेक्स बांगड्या होत्या व त्याबरोबर दोन तोळ्याचा पुणे येथे खरेदी केलेला एक सोन्याचा हार होता. परंतु तो फिकट पिवळा असल्यामुळे तो हार बनावट समजून बेन्टेक्सच्या बांगड्याबरोबर चोरांनी शिवाजी भुजबळ यांच्या वीट भट्टी जवळ टाकून दिला.

दरम्यान, अहमदनगर येथून श्वानपथक आल्यानंतर पथकाने चोर गेलेला मार्ग दाखवला. पोलीस उपअधीक्षक संजय सातव पोलिसांसह घटनास्थळी उपस्थित राहून घटनास्थळाची पहाणी केली. याबाबत अधिक तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here