Ahmednagar : तब्बल ४६५ रुग्णांना आज मिळाला ‘डिस्चार्ज’

रुग्णालयातून घरी गेलेल्या रुग्णांची संख्या आता १९४५
आज दुपारपर्यंत ६४ नव्या रुग्णांची भर
अहमदनगर: जिल्ह्यात आज तब्बल ४६५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या मध्ये ही सर्वाधिक संख्या आहे. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या आता १९४५ झाली आहे. दरम्यान (शनिवार) सायंकाळपासून आज  दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण रुग्ण संख्येत ६४ रुग्णांची भर पडली. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता ११३६ इतकी झाली असून एकूण रुग्ण संख्या ३१३२ इतकी झाली आहे. 
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ६४ जण बाधित आढळून आले. यामध्ये अहमदनगर (2)- अहमदनगर (1), फकिरवाड़ा(1), संगमनेर (36)- पदमा नगर (4), बाजारपेठ (2), जनता नगर (2), जेढे कॉलनी (3), संगमनेर (3), विद्यानगर (2), बडोदा बँक (3), राजापूर(2),  कोंची (1), पिंपळगाव देपा(1), सुकेवाडी(3), शिबलापूर(1), गणेशनगर (3),  कुरण (1), मुटकुळे हॉस्पिटल(1), खंडोबा गल्ली(2), गुंजाळवाडी (1), जवळे कडलग (1)
कर्जत(10) – राशीन(4), मिरजगाव(3), कर्जत (2), पिंपळवाडी (1), राहाता (12) – शिर्डी (10), नांदुरखी (1), गोगलगाव(1), राहुरी (4)- राहुरी बु. -(1), येवले आखाडा (1), वांबोरी(1), कात्रड(1),
*उपचार सुरू असलेले रुग्ण: ११३६*
*बरे झालेले रुग्ण: १९४५*
*मृत्यू: ५१*
*एकूण रुग्ण संख्या:३१३२*
*STAY HOME STAY SAFE*
*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*
*स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या*

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here