Newasa : तालुक्यात कोरोनाने शंभरी ओलांडली, रविवारी नऊ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

करजगाव-५, भेंडे-१, जळके-१, गळनिंब-२

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

नेवासा –  तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या काल शनिवारपर्यंत ९६ अशी होती रविवारी दुपारी ताजा अहवाल आल्यानंतर त्यात नऊ कोरोना बाधित रुग्णांची भर पडल्याने नेवासा तालुक्याने कोरोनाने शंभरी ओलांडली असून आजपर्यंतची कोरोना रुग्ण संख्या १०५ इतकी झाली आहे.

रविवारी आलेल्या ताज्या अहवालानुसार नेवासा तालुक्यातील करजगाव येथे ५, भेंडे व जळके प्रत्येकी १ तर गळनिंब २ असे रुग्ण आढळून आले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. नेवासा तालुक्यातील कोरोना बाधितांची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असून याबाबत तहसीलदार रुपेश सुराणा हे डोळ्यात तेल घालून परिस्थितीवर लक्ष ठेऊन असून नेवासा तालुक्यातील आरोग्य विभागाने देखील युद्धपातळीवर उपाययोजना करणे गरजेचे असल्याच्या सर्वसामान्य माणसांच्या प्रतिक्रिया आहेत.

नेवासा तालुक्यात नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रे असून येथे काय उपाययोजना केली जात आहे. याबाबत विचारण्यासाठी आरोग्य अधिकारी फोन उचलत नाही ही गंभीर बाब आहे.नेवासा तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य तत्परतेने पावले उचलावीत अशी मागणी नेवासा तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.

एकाच कुटुंबात पाच रुग्ण

करजगाव येथे एकाच कुंटुबातील पाच व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव आले आहेत. यामुळे करजगावकरांची धाकधुक आणखी वाढली आहे. 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here