राममंदिराचे ई-भूमिपूजन करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्टला राममंदिर भूमिपूजन होणार आहे

राम मंदिराचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ई-भूमिपूजन करावे, असा सल्ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. अनेकांच्या भावना याच्याशी जोडल्या आहेत, असे उद्धव म्हणाले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सामनाचे संपादक आणि खासदार राऊत यांनी मुलाखत घेतली. ही मुलाखत सामनाच्या ऑफिशिअल चॅनलवर दि. 25 आणि दि.26 रोजी प्रसारित करण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राममंदिर भूमिपूजनाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.

सध्या राममंदिर भूमिपूजनाचा विषय वादग्रस्त चर्चेचा मुद्दा बनलाय. यापूर्वी शरद पवारांनी यावर वादग्रस्त विधान केले होते. त्याला उमा भारती यांनी प्रतिउत्तरात पवारांना श्रीरामद्रोही ठरवलं. या पार्श्वभूमीवर राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना राममंदिर भूमिपूजनासाठी जाणार का असा प्रश्न विचारला.

यावर ठाकरे म्हणाले मी मुख्यमंत्री आहे मी जाईनही. मात्र राममंदिर भूमीपूजनाला एका लढ्याचा इतिहास आहे. त्यासाठी शरयूत अनेकांनी आपले रक्त वाहिले आहे. त्यामुळे अनेक जणांना तिथे उपस्थित राहण्याची इच्छा असेल. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे शक्य नाही. हा अनेकांच्या हृदयाचा तसेच भावनिकतेचा मुद्दा आहे. त्यामुळे भूमिपूजन हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ई-भूमिपूजनच करावे, असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here