Sangamner : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या सव्वापाचशेच्या पुढे… 

3

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

संगमनेरमध्ये कोरोनाचे धक्का चक्र जोरात सुरू असून काल शनिवारी रात्री उशिरा शासकीय प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या अहवालात एकाच वेळी तब्बल 34 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर सकाळी 11 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते त्यामुळे काल एकूण 45 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने व एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 528 झाली आहे त्यामुळे संगमनेरसह जिल्यात खळबळ उडाली आहे.

काल रात्री उशिराने प्राप्त झालेल्या शासकीय प्रयोगशाळेच्या अहवालातून संगमनेर शहरात व तालुक्याच्या नवनवीन भागात कोरोनाचे संक्रमण झाल्याचे आढळून आले आहे.  शहरातील एका राष्ट्रीय बँकेतील तिघांचे अहवालही पॉझिटिव्ह आल्याने शहराच्या बँकिंग क्षेत्रात पहिल्यांदाच खळबळ उडाली आहे. या बँकेतील 35 वर्षीय व 33 वर्षीय तरूण कर्मचाऱ्यांसह 27 वर्षीय महिला कर्मचाऱ्यालाही कोरोनाची लागण  झाल्याचे समोर आले आहे. त्याबरोबरच कोविडच्या विषाणूंनी स्वातंत्र चौक परिसरातील एका 53 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची  लागण झाली आहे.

गणेशनगर परिसरातील 33 वर्षीय महिलेसह त्यांच्या 10 व 2 वर्षीय बालिकेला ही कोरोनाचे संक्रमण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर खंडोबा गल्ली परिसरातील 72 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 40 वर्षीय महिला बाधित झाल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे., जेधे कॉलनी परिसरातून 52 वर्षीय व 21 वर्षीय पुरुषांसह 40 वर्षीय महिला, तर शहरातील 28 वर्षीय महिलेसह त्यांच्या 6 व 1 वर्षीय बालिकांनाही कोरोनाची बाधा झाली आहे.

तसेच विद्यानगर परिसरातील 47 वर्षीय व 34 वर्षीय व्यक्ती, बाजारपेठेतील 58 वर्षीय महिलेसह 36 वर्षीय तरुण, जनतानगर परिसरातील 45 वर्षीय पुरुष व 37 वर्षीय महिला, पद्मनगर परिसरातील 28 वर्षीय तरुणांसह 47 वर्षीय, 22 वर्षीय महिला व एका तीन वर्षीय बालिकेलाही कोरोनाचे संक्रमण झाले आहे. तर शहरा सोबतच तालुक्यातील रुग्ण संख्येतही नव्याने नऊ बाधितांची भर पडली आहे. त्यात सुकेवाडीतील 65 वर्षीय, 42 वर्षीय व 45 वर्षीय पुरुष, गुंजाळवाडी परिसरातील 45 वर्षीय महिला, राजापूरमधील 30 वर्षीय तरुण, कोंचीतील 22 वर्षीय तरुण, पिंपळगाव देपा येथील 15 वर्षीय मुलगा, शिबलापुरमधून 23 वर्षीय महिला व कुरणमधून 45 वर्षीय व्यक्तीस कोरोनाचे संक्रमण झाल्याचा शासकीय प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाला आहे.

या अहवालातून एकूण 34 रुग्णांसह दिवसभरात एकूण 45 रुग्णांची भर पडल्याने तालुक्यातील बाधितांच्या संख्येने पाचशेचा टप्पा ओलांडून एकूण रुग्णसंख्या 528 वर  घेतली आहे. या वृत्ताने अवघ्या संगमनेर तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here